Entertainment News Live Updates 10 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 10 Dec 2022 02:45 PM
Sulochana Chavan Passes Away : आज संध्याकाळी 4 वाजता सुलोचनाबाईंच्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार

Sulochana Chavan Passes Away : प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी मुंबईतील गिरगाव फणसवाडीमधील लीला तारा इमारत या त्यांच्या राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज संध्याकाळी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर चंदनवाडी येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. 

Sulochana Chavan Passes Away : सुलोचनाताई चव्‍हाण यांच्‍या निधनाने लावणीचा अभिजात सूर हरपला : सुधीर मुनगंटीवार 

Sudhir Mungantiwar : लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचनाताई चव्‍हाण यांच्‍या निधनाने लावणीचा अभिजात सूर हरपल्‍याची शोक भावना सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे. बैठकीची लावणी किती समृध्‍द असावी याचा वस्‍तुपाठ सुलोचनाताईंनी घालून दिला आहे. अनेक तमाशा प्रधान चित्रपटांतून त्‍यांनी ठसकेबाज स्‍वरात लावण्‍या सादर केल्‍या. चपळ, फटकेबाज शब्‍दांना आपल्‍या आवाजाच्‍या, सुरांच्‍या माध्‍यमातून ठसका आणि खटका देण्‍याचे काम सुलोचनाताईं इतके कोणीही उत्‍तम करू शकलेले नाही. पाठीमागे अंतरे कसेही असोत पण लावणीच्‍या मुखडयाची सुरूवात ठसकेबाजच झाली पाहिजे, असे सुलोचनाताईंचे ठाम मत होते आणि याचा प्रत्‍यय त्‍यांनी गायलेल्‍या लावण्‍यांतून येतोच. सुलोचनाताई लावणीचे चालते-बोलते विद्यापीठ होते. शास्‍त्रीय गायकीचे कोणतेही विधीवत शिक्षण न घेता दीर्घकाळ त्‍यांनी लावणीच्‍या माध्‍यमातून रसिक प्रेक्षकांच्‍या मनावर उमटविलेला ठसा कधीही विसरू शकणार नाही. त्‍यांनी गायलेल्‍या लावण्‍यांनी जनमानसांच्‍या हृदयात मानाचे स्‍थान मिळविले आहे. लावणीला राजमान्‍यता, लोकमान्‍यता आणि प्रतिष्‍ठा मिळवून देणा-या सुलोचनाताईंच्‍या निधनाने या क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली असल्‍याचे सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोक संदेशात म्‍हटले आहे.

Sulochana Chavan Passes Away : सुलोचनाबाई चव्हाण यांच्या निधनानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला

Uddhav Thackeray : सुलोचना चव्हाण. गायन क्षेत्रामधील एक दिग्गज व्यक्ती ज्यांचं नाव घेतलं की तीच व्यक्ती समोर येते त्यांच्यापैकीच एक त्या होत्या. त्या मनामध्ये कायम राहणाऱ्या व्यक्ती होत्या. मी शिवसेनेच्या आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहतो. 

Kshitish Date : छोट्या पडद्यावर प्रभावी ठरणारी मालिका 'लोकमान्य' : क्षितिज दाते

Kshitish Date On Lokmanya : 'लोकमान्य' (Lokmanya) ही मालिका येत्या 21 डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत लोकमान्य टिळकांच्या (Lokmanya Tilak) भूमिकेत अभिनेता क्षितिज दाते (Kshitish Date) दिसणार आहे. या मालिकेसंदर्भात बोलताना क्षितिज दाते म्हणाला,"'लोकमान्य' ही मालिका माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे". 





Veena Kapoor : धक्कादायक! घरासाठी मुलाने केली अभिनेत्रीची हत्या

Veena Kapoor : मनोरंजनसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री वीणा कपूर (Veena Kapoor) यांच्या मुलानेच संपत्तीसाठी त्यांची हत्या केली आहे. मुंबईतील जुहू भागात ही घटना घडली आहे. अभिनेत्री नीलू कोहलीने (Nilu Kohli) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 





Amrish Puri Biopic : लवकरच येणार अमरीश पुरी यांचा बायोपिक

Amrish Puri Biopic : हिंदी सिनेसृष्टीत सध्या बायोपिकचा (Biopic) ट्रेंड आहे. अशातच आता 'मोगॅम्बो'  उर्फ दिवंगत अभिनेते अमरीश पुरी (Amrish Puri) यांचा बायोपिक येणार असल्याचं समोर आलं आहे. रुपेरी पडद्यावरचा खलनायक खऱ्या आयुष्यात कसा होता हे प्रेक्षकांना या सिनेमाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. 

Salaam Venky Box Office Collection : काजोलचा 'सलाम वेंकी' रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला

Salaam Venky Box Office Collection Day 1 : बॉलिवूड अभिनेत्री काजोलने (Kajol) अनेक दिवसांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं आहे. नुकताच तिचा 'सलाम वेंकी' (Salaam Venky) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात काजोलसह विशाल जेठवा (Vishal Jethwa) मुख्य भूमिकेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हा सिनेमा चर्चेत होता. पण रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे. 





ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी Sara Ali Khan चा लोकलने प्रवास

Sara Ali Khan Local Train Video : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) तिच्या साधेपणासाठी ओळखली जाते. ग्लॅमरस जगात वावरताना ती नेहमीच जमिनीवर राहण्याचा प्रयत्न करते. नुकतच तिने लोकन ट्रेन आणि रिक्षाने प्रवास केला आहे. प्रवासादरम्यानचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. 





Ashok Kumar Death Anniversary : जाणून घ्या सिनेसृष्टीतील 'दादामुनी' उर्फ अशोक कुमारांबद्दल..

Ashok Kumar : 'दादामुनी' या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते अशोक कुमार (Ashok Kumar) यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांची गणना बॉलिवूडच्या (Bollywood) अतुलनीय नायकांमध्ये केली जाते. अनेक दशकं त्यांनी सिनेसृष्टी गाजवली आहे. तसेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येदेखील त्यांचं नाव नोंदवलं गेलं आहे.

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते मालिकेत अनघाच्या डोहाळ जेवणाचा थाट


Aai Kuthe Kay Karte: स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिकेचं कथानक सध्या अतिशय रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. एकीकडे अरुंधती आपलं नवं आयुष्य सुरु करु पहातेय तर दुसरीकडे अनघाच्या आयुष्यातही नवा पाहुणा येणार आहे. अनघा लवकरच आई होणार असून देशमुख कुटुंबाने थाटामाटात अनघाचं डोहाळजेवण करायचं ठरवलं आहे. देशमुख कुटुंबात प्रत्येक सण-समारंभ अगदी उत्साहात साजरा केला जातो. अनघाच्या डोहाळ जेवणाला सुद्धा संपूर्ण देशमुख कुटुंब एकत्र येऊन जल्लोष करणार आहे.


प्लॅनेट मराठी ओटीटीवरील 'अथांग' वेबसीरिजचे अंतिम भाग प्रदर्शित


प्लॅनेट मराठी ओटीटीवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जयंत पवार दिग्दर्शित 'अथांग' (Athang) या वेबसीरिजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मराठी वेबसीरिजच्या इतिहासात पहिल्याच दिवशी सर्वात जास्त बघितली जाणारी ही पहिली वेबसीरिज ठरली आहे. या रहस्यमय वाड्यात अनेक गुपिते दडलेली असून एक एक करून ती समोर येत आहेत. आता ही वेबसीरिज एका अशा वळणावर आली आहे, जिथे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच आता या वेबसीरिजमधील एक प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘खुलते इथे कळी’ असे या सुमधूर गाण्याचे बोल असून हे गाणे शरयू दाते आणि रोहित राऊत यांनी गायले आहे. गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला रोहित राऊत याचे संगीत लाभले आहे. या गाण्यात राऊ आणि सुशीलाचे हळूवार खुलत जाणारे प्रेम दिसत आहे. बाईच्या नजरेला नजर न देणाऱ्या राऊच्या डोळ्यांतून आता प्रेम व्यक्त होताना दिसतेय, त्यामुळे आता वाड्यात काय घडणार, हे जाणून घेण्यासाठी ‘अथांग’ ही वेबसीरिज पाहावी लागेल. ही वेबसीरिज प्रेक्षकांना प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहता येईल.


Akshay Kumar: खिलाडी कुमारनं पहिल्यांदाच चाहत्यांना दाखवलं त्याचं आलिशान घर


Akshay Kumar:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारनं (Akshay Kumar) आता त्याच्या नव्या फॅशन ब्रँडची घोषणा केली आहे. या ब्रँडचं नाव फोर्सनाइन असं आहे. अक्षयनं नुकताच एक खास व्हिडीओ शेअर करुन त्याच्या या नव्या ब्रँडची माहिती चाहत्यांना दिली. या व्हिडीओमध्ये अक्षयचं आलिशान घर देखील दिसत आहे. अक्षयनं व्हिडीओमध्ये त्याच्या घरातील वॉर्डरोब देखील आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.