Mallika sherawat: 'मर्डर' फेम मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) हिने नव्या अंदाजात राज शांडील्य दिग्दर्शित 'विकी और विद्या का वो वाला व्हिडिओ' या चित्रपटातून धमाकेदार वापसी केली आहे. या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू असून बिग बॉसच्या घरातही मल्लिकासह संपूर्ण स्टारकास्ट जाणार असल्याने चर्चा रंगली आहे. दरम्यान काही वर्षांपूर्वी फिल्म इंडस्ट्रीमधल्या आपल्या अनुभवांवर एका मुलाखतीत बोलली होती. साउथच्या एका निर्मात्याने तिच्या कमरेवर केलेल्या कमेंटनं ती हादरून गेल्याचं तिने यात सांगितलंय. निर्मात्याचा त्या कमेंटवर तिनं हसत या चित्रपटाला नकार दिल्याचेही सांगितलं. 


काय म्हणाली मल्लिका शेरावत?


मेल फेमिनिस्टला मुलाखत देताना साउथ चा एका निर्मात्याने मल्लिकाचा हॉटनेस दाखवण्यासाठी केलेली कमेंट तिने शेअर केली. यात निर्मात्याच्या अतर्क मागणीकडे तिने लक्ष वेधले. एका गाण्याच्या शूटिंगसाठी साउथ चा एका निर्मात्याने तिला विचारले होते. या गाण्यात ती किती आकर्षक आहे हे निर्मात्याला दाखवायचे होते. तुम्हारी कमर पे हिरो रोटीया सेकेगा... अशी कमेंट तर निर्मात्याने केल्याचं मल्लिकानं सांगितलं. या गाण्यासाठी तिने नकारही दिल्याचं तिने स्पष्ट केलं. पण हा अनुभव सांगण्यामागचं कारण हे लोकांचं मांइंडसेट काय झालंय हे सांगण्यासाठी सांगतेय असंही ती म्हणाली.


बिग बॉसच्या घरातील मल्लिकाच्या एन्ट्रीची चर्चा 


 बिग बॉस 18 परवाच्या पहिल्या आठवड्यानंतर हा रविवार घरातील सर्वांसाठीच मनोरंजनाचा ठरणार आहे. मल्लिकाचा नवा सिनेमा विकी विद्या का वो वाला व्हिडिओ याच्या प्रमोशनसाठी मल्लिका शेरावत आज बिग बॉसच्या घरात येणार आहे. सलमान खान सोबत तिचा रोमँटिक अंदाज पाहून आणि घरातील सदस्यांसोबत केलेली बातचीत कलर्स टीव्हीने त्यांच्या सोशल मीडिया पेजवरून शेअरही केली आहे. बिग बॉसच्या घरात आज सेलिब्रिटींची चंगळ आहे . कलर्स टीव्हीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये  मल्लिका शेरावतच्या एंट्रीने स्पर्धकांनीही ठेका धरला . आज बिग बॉसच्या घरात मल्लिका शेरावत सह राजकुमार राव आणि तृप्ती डीमरी त्यांच्या फिल्मचं प्रमोशन करण्यासाठी येणार आहेत . यावेळी मल्लिकाचा दिल खेचत अंदाज प्रेक्षकांना खेळवून ठेवणार यात शंका नाही . या रविवारी राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी देखील पाहुणे म्हणून येणार आहेत. तिचा 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.