Karan Johar: सध्या बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहर याच्या धर्मा प्रोडक्शनची जोरदार चर्चा आहे. करणनं त्याच्या त्याच्या धर्मा प्रोडक्शनबाबतीत एक मोठा निर्णय घेतलाय.  सोमवारी त्यानं थेट या बाबतीतलं पत्रच काढल्यानं एकच चर्चा होतेय.  धर्मा प्रोडक्शनमध्ये यापुढे कोणत्याही सिनेमाचं प्री स्क्रिनिंग ठेवणार नसल्याचा निर्णय त्यानं घेतलाय. सिनेमाचा अनुभव टिकवून ठेवण्याची गरज लक्षात घेत त्यानं हा निर्णय घेतला आहे. त्यानं प्रसिद्ध केलेल्या प्रोडक्शन हाऊसच्या निवेदनावर करण आणि अपूर्व मेहता यांची स्वाक्षरी आहे.


काय लिहिलंय करणनं?


या पत्रात सर्व माध्यमांना संबोधित करण्यात आलं असून त्यानं लिहिलंय, वर्षानुवर्षे खरेतर अनेक दशके, तुम्ही धर्मा प्रोडक्शनच्या मागे खंबीरपणे उभारलात. आमच्या सिनेमांना पाठिंबा दिलात. आमची स्वप्न वाटन आमचे विजय साजरे करत आहात. तुमचा आमच्यावरील विश्वास हा आमच्या संपूर्ण प्रवासात एक प्रेरक शक्ती आहे. हा क्षण तुमच्या सर्वांचे मनापासून आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी घेतोय. असं करणनं या पत्रात म्हटलंय.




आगामी चित्रपटांचे प्री रिलिज स्क्रीनिंग बंद


 आम्ही विकसित होत असताना, आम्ही स्वतःला अशा टप्प्यावर शोधतो जिथे आम्हाला आमचा दृष्टीकोन जुळवून आणणे आणि नवीन करणे आवश्यक आहे. त्यामुळे खूप विचारविनिमय करून आम्ही सर्वानुमते आमच्या आगामी चित्रपटांचे प्री रिलिज स्क्रीनिंग बंद करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयात मिडियातील आमच्या मित्रांसह प्रत्येक दर्शक आमच्या कथांचा साक्षीदार असेल याची आम्हाला खात्री आहे. सिनेमॅटिक अनुभवाचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी हा निर्णया सर्वांसाठी मदत करेल. असं करण म्हणाला.


प्रीरिलिज होणाार नसले तरी...


धर्मा प्रोडक्शनने आगामी सिनेमांचे प्रीरिलिज थांबवले असले तरी वेळेवर रिव्हू आणिआम्हाला वेळेवर परीक्षणांचे महत्त्व लक्षात घेत चित्रपटांच्या रिलिजच्या पहिल्या दिवशी माध्यमांसाठी रिलिज ठेवण्यात येणार आहे. असं करण म्हणाला.  आमच्या चित्रपटांच्या यशात परिक्षणाची मोठी भूमिका आहे. त्यामुळे आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की आम्ही आमच्या प्रत्येक चित्रपटासाठी रिलीज दिवसाच्या पहिल्या सहामाहीत प्रेस स्क्रीनिंग आयोजित करणार आहोत. चित्रपट या स्क्रिनिंगमध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही सर्व मीडिया कर्मचाऱ्यांचे मनापासून स्वागत करतो.