Bigg Boss marathi: बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व संपले खरे पण  या पर्वाचा विजेता गुलीगत सुरज चव्हाणची क्रेझ कायम असल्याचंच दिसून येतंय. आपल्या बुक्कीत टेंगूळ, झापूक झुपुक स्टाईलमुळे फेमस झालेल्या सुरजनं विजेतेपद मिळवल्यानंतर मनोरंजनसृष्टीपासून राजकारण्यांपर्यंत सर्वांच्या भेटी घेतल्या. पण आता त्यानं महाराष्ट्रातली लोकप्रिय लावणी डान्सर गौतमी पाटील हिची भेट घेतली आहे. याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.


गौतमी पाटीलनं शेअर केला व्हिडिओ


सुरज चव्हाणशी भेटीचा गुलिगत व्हिडीओ खुद्द गौतमीनंच शेअर केला आहे. गौतमी पाटीलनं सुरजशी भेटीशी व्हिडीओ पोस्ट करत बिग बॉस विजेता सुरज चव्हाण असं कॅप्शन त्या पोस्टला दिलं आहे. या व्हिडिओवर लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळालेत, यात शंकाच नाही.






झापुक झुपूक स्टाईल राज्यभर झाली फेमस


बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचा विजेता सुरज चव्हाणनं झापूक झुपूक स्टाईलनं राज्यात सगळ्यांच्या मनात स्वतंत्र स्थान निर्माण केलं. अगदी राजकारणापासून मनोरंजनसृष्टीतील कलाकार ते प्रेक्षकांपर्यंत सुरजचा चाहतावर्ग मोठा आहे. आता त्यानं गौतमी पाटीलची भेट घेतली आहे. सोशल मिडियावरून गौतमी पाटीलनं सुरजची गप्पा मारत असल्याचा व्हिडिओ शेअर केलाय. यात ती सुरजशी गप्पा मारताना हसत असल्याचं यात दिसतंय. हम तो ऐसे है भैय्या.. असे गाणे लावत तिनं ही पोस्ट केली आहे. या व्हिडिओला  प्रेक्षकांनी 3 लाख 65 हजार 973 जणांनी लाईक केलं आहे.


गौतमीचा फॅनबेसही मोठा


गौतमी पाटीलचा (Gautami Patil) एक मोठा चाहतावर्ग महाराष्ट्रात आहे. तिच्या कार्यक्रमांना होणारी तुंडुंब गर्दीही त्याचं उत्तर देते. त्यामुळे तिचा कार्यक्रम पाहण्याची प्रत्येकाला इच्छा असते. हीच गौतमी पाटील आता मोठ्या पडद्यावर एका गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या मराठी सिनेमातलं तिचं एक गाणं बरंच गाजतंय. लाईक आणि सब्सक्राईब या सिनेमात अभिनेता अमेय वाघसोबत गौतीमी थिरकताना दिसतेय. लिंबू फिरवलं असं या गाण्याचं नाव असून सोशल मीडियावरही या गाण्याची बरीच चर्चा सुरु आहे. नुकताच या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. 


गौतमीचा कार्यक्रम पाहण्याची अमेयची इच्छा


गाण्याच्या शूटनंतर गौतमीकडून तिच्या कार्यक्रमांचं काही आमंत्रण वैगरे आलं का? यावर बोलताना अमेय वाघने म्हटलं की, 'मीच तिला शुटींगच्या वेळी म्हटलं की, मला तुझे कार्यक्रम पाहायला यायचं आहे. कारण मी ते सगळे व्हिडीओ पाहिले आहेत. ते वातावरण खूप भारी असतं. सगळे फॅन्स कुठून कुठून आलेले असतात. कोण छतावर बसलं असतं, कोण झाडावर बसलेलं असतं. त्यामुळे एकदा मी जाईन तिचा शो बघायला. '