Bigg Boss 18: बिग बॉसचे १८ वे पर्व सध्या टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त असणारा रिॲलिटी शो आहे. एकीकडे या शोचा होस्ट सलमान खान याच्यावर बिश्नाई गँगच्या धमक्यांचा मारा होत असल्यानं या शोची चर्चा आहे. तर दुसरीकडे घरातील स्पर्धकांच्या भांडणामुळेही सध्या या शोला प्रेक्षकांना डोक्यावर घेतलं आहे.  या शोच्या पहिल्या दिवसापासूनच घरात काही न काही घडत असल्याचं प्रेक्षकांनी पाहिल्यानंतर गेल्या काही भागांमध्ये घरातील वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले. घरात जेंव्हा जेव्हा वाद होतात तेव्हा स्पर्धक एकमेकांवर चिखलफेक करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता नव्या भागाच्या नुकत्याच आलेल्या प्रोमोमधून घरातील सदस्यामधलं भांडण समोर आलंय. 


रेशन देण्यास दिला नकार


बिग बॉस १८ चा स्पर्धक अविनाश मिश्रा हा घरातील सर्वात मजबूत खेळाडूंपैकी एक मानला जातो. गेल्या काही भागांमध्ये घरातील तणाव शिगेला पोहोचला होता. आता रेशनच्या वाटपावरून घरातील स्पर्धकांशी घातलेल्या जोरदार वादानंतर शोमधून बाहेर पडावे लागले होते. काही काळानंतर बिग बॉस स्वत: अविनाश मिश्राला परत आणण्याचा आणि तुरुंगात टाकण्याचा निर्णय घेतात. यानंतर त्याला रेशन वाटपाची जबाबदारी दिली जाते. अविनाश परत आल्यानंतर  आणि त्याला रेशनची ड्यूटी देण्यात आल्यावर त्यानं खलनायकाप्रमाणे भूमिका साकारण्याचे ठरवले आणि आपल्या सहकार्यांना रेशन देण्यास नकार दिला.


रजतनं दिली अविनाशला दिली जाहीर धमकी


रजत दलाल यांनी अविनाश मिश्रा यांना तुरुंगात जाणे कठीण बनवण्याचे खुले आव्हान दिले. तेंव्हा सर्व घरातील सदस्यांमधला वाद वाढला. अहमदाबादमधील १८ वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण आणि प्राणघातक हल्ला केल्याच्या कायदेशीर आरोपानंतर वास्तवीक आयुष्यात तुरुंगात गेलेल्या रजतनं कालच्या एपिसोडमध्ये अविनाशला नॅशलल टीव्हीवर धमकी दिल्याचं दिसलं. तुरुंगात मी राजा आहे. त्याचं राहणं आणि झोपणं मी अशक्य करून टाकेन असं म्हणत रजतनं धमकी दिलयाचं दिसलं.


कमबॅक करताच बिग बॉसच्या घरात अविनाशचं तांडव


बिग बॉसच्या घरात परतल्यावर अविनाश मिश्रा घरातील इतर सदस्यांच्या नाकी नऊ आणताना दिसणार आहे. आज अविनाश घरातील सदस्यांना राशन देण्यावरुन वाद घालताना दिसणार आहे. बिग बॉसने सोशल मीडियावर शेअर केलेल्या नवीन प्रोमोमध्ये राशन देण्यावरुन शिल्पा शिरोडकर आणि अविनाश मिश्रा यांच्या जोरदार बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळणार आहे. यानंतर शिल्पा शिरोडकर अविनाशने दिलेल्या राशनमध्ये बनलेलं जेवण खाण्यास नकार देताना दिसत आहे.