Janhavi Killekar: बिगबॉस मराठीच्या पाचव्या पर्वात प्रेक्षकांची मने जिंकणारी आणि ९ लाख रुपयांची बॅग घेऊन बाहेर पडण्याच्या निर्णयामुळे चर्चेचा विषय ठरलेली स्पर्धक जान्हवी किल्लेकर हिनं तिच्या नवऱ्याला दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलंय. एका मुलाखतीत बिग बॉसच्या घरात केलेल्या चूका माझ्या आहेत. त्यामुळे माझ्या घराच्यांची काहीच चूक नसल्याचं तिनं म्हटलंय. माझ्या नवऱ्याला इडलीवाला म्हटलं गेलं. का एखाद्या दिसण्यावर बोलाव? असं म्हणत तिनं ट्रोलर्सचा चांगलंच खडसावलंय. 

Continues below advertisement


काय म्हणाली जान्हवी किल्लेकर?


बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर जान्हवी किल्लेकर हिनं मीडिआ टॉकला दिलेल्या मुलाखतीत तिच्या कुटुंबातील लोकांना विशेषत: तिच्या नवऱ्याला ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. ती म्हणाली. बिग बॉसच्या घरात ज्या काही चुका झाल्या त्या माझ्याकडून झाल्या. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर दु:ख झालं. माझ्यामुळे माझं कुटुंब, जाऊबाई, सासू, नवरा, आईवडील, मुलगा ट्रोल झाले. मी चुका केल्यात, तर मला बोला; त्यांना नका बोलू. त्यांची काहीच चूक नाही. माझ्या नवऱ्याला इडलीवाला वगैरे म्हटले गेले. का एखाद्याच्या दिसण्यावर बोलावं? माझा स्वभाव तसा नाहीये. 


तुम्ही कशाला जज करताय? जान्हवीनं केला सवाल


इडलीवाला, काळासावळा अशाप्रकारे ट्रोल करण्यात आल्यानंतर  मी माणसाचं दिसणं बघून प्रेम करीत नाही. तो माणूस किती हुशार आहे किंवा तो काय करू शकतो, या दृष्टिकोनातून मी लोकांकडे बघते. आतापर्यंत एखादा माणूस दिसायला सुंदर, हॅण्डसम आहे म्हणून मला कधी प्रेम झालं नाही. तो माणूस म्हणून कसा आहे, तो माझ्यासाठी काय करू शकतो, हे बघून मला त्याच्यावर प्रेम आहे. आमचं प्रेम आहे. ती माझी निवड आहे. तुम्ळी कशाला जज करताय? असा सवालही जान्हवीनं केलाय. 


माझ्यासाठी तो परफेक्ट


भलेही हॅंडसम नसेल. मी मान्य करते की सावळा आहे. काळा आहे. पण माझा आहे.माझ्यासाठी तो परफेक्ट आहे. मला झेलणं सोपं काम नाहीये. तो घरात मला आणि आमचा मुलगा, अशा दोन लहान मुलांना सांभाळतो”