Anupam Kher: अनुपम खेर आणि किरण खेर हे बॉलीवूडच्या सर्वात प्रेमळ जोडप्यांपैकी एक समजले जातात. जवळपास 40 वर्षांचा संसार झाला असला तरी इतक्या वर्षांमध्ये अनेकदा सार्वजनिकरित्याही ते एकमेकांविषयी बोलले आहेत. चंदीगडच्या कॉलेजमधली मैत्री आणि नंतर मुंबईत एकमेकांच्या प्रेमात पडले. अनब्लॉक शुभंकर या शोमध्ये नुकताच दिलेला मुलाखतीत अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या प्रेमाचा किस्सा सांगितला. आपल्याला मुल नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. 


किरण खेरचे पूर्वी उद्योगपती गौतम बेरीशी लग्न झाले होते. किरण आणि गौतम यांना सिकंदर नावाचा मुलगा झाला. पण त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही. घटस्फोट झाल्यानंतर अनुपम आणि किरण यांनी एकमेकांशी लग्न केले तेव्हा सिकंदर चार वर्षांचा होता. लग्नानंतर अनुपम यांनी किरण खेर यांचा मुलगा सिकंदर याला दत्तक घेतले आणि त्याला आपले आडनाव दिले. 


आम्ही दोघेही कठीण काळातून जात होतो


त्यावेळी किरण आधीच लग्नाच्या बेळीत अडकली होती. माझे लग्न झाले नव्हते. आम्ही बारा वर्षे चांगले मित्र होतो. कॉलेजमध्ये असताना ती माझी सीनियर होती. स्टार होती. तिच्या वर्गात पहिली यायची. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि देशपातळीवरील बॅडमिंटनपटू होती. मी मुंबईला आलो आणि गौतम बेरशी लग्न झाल्यावर ती ही मुंबईत आली. जेव्हा ती तिच्या वैवाहिक जीवनात कठीण काळातून जात होती तेव्हा मीही एका वाईट नात्यातून गेलो. असं अनुपम खेर यांनी या मुलाखतीत सांगितलं.


मुलाला वाढताना पाहण्यात आनंद मिळतो पण...


आपल्यालाही मुल असावं असं आधी वाटायचं नाही पण गेल्या सात आठ वर्षांपासून असं वाटायला लागलंय. सिकंदरवर नाखुश आहे असं नाही पण मुलाला वाढताना पाहणं यात मोठा आनंद असतो. किसी को मुकंमल जहा नही मिलता.. किसी को जमीं किसी को आसमान नही मिलता... हे माझ्या आयुष्यातलं दुःख नाही. पण मला कधीतरी वाटतं की मुल असलं असतं तर बरं झालं असतं. असं अनुपम खेर म्हणाले. हे इतक्या वर्षांनी वाटण्याचा कारण म्हणजे खूप काम करायचो. 50 -55 चा झाल्यावर हळूहळू कळायला लागलं. आता माझ्या मित्रांचे मुलं पाहतो. त्यांचा एकमेकांशी असलेला बॉण्ड पाहतो. पण माझ्या आयुष्यात नुकसान झालंय असं मला वाटत नाही. असं म्हणत अनुपम खेर यांनी खंत व्यक्त केली.