Donate Sperm: काही वर्षांपूर्वी अभिनेता आयुषमान खुरानाचा (Ayushmann Khurrana) 'विकी डोनर' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. वेगळ्या विषयावर बनवलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे मनोरंजन तर केलेच पण लोकांमध्ये जागरूकताही निर्माण केली. चित्रपटाची कथा एका शुक्राणू दात्याबद्दल होती. 'विकी डोनर'ने (Donate Sperm) बॉक्स ऑफिसवर कमाल केली आणि चित्रपट समीक्षकांनाही प्रभावित केलं होतं. पण तुम्हाला माहिती आहे का की, या चित्रपटाप्रमाणे खऱ्या आयुष्यात देखील काही सेलिब्रिटींनी स्पर्म डोनेट केले आहेत. एका दिग्दर्शकाने तर स्पर्म डोनेट (Donate Sperm) करून पैसेही कमावले असल्याची माहिती आहे.

Continues below advertisement

अभिनव कश्यप

दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा भाऊ अभिनव कश्यप हा देखील व्यवसायाने दिग्दर्शक आहे. सलमान खानच्या दबंग चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनीच केले होते. अभिनवने चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्याचे स्पर्म डोनेट (Donate Sperm) केले आहेत. दिग्दर्शकाने स्वतः याबद्दल खुलासा केला होता. अभिनवने एका मुलाखतीत सांगितले होते की, दिल्लीतील एका महाविद्यालयात शिकत असताना ते नोकरी म्हणून स्पर्म डोनेट करत असे. त्यांनी दिल्लीतील गौरी रुग्णालयात त्याचे स्पर्म डोनेट केले होते. अभिनवसोबत त्याचे मित्रही हेच काम करायचे असा खुसाला देखील त्यांनी केला आहे.

मनीष नागदेव

मधुबाला, पवित्र रिश्ता, बेगुसराय या टीव्ही मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारणारा अभिनेता मनीष नागदेवने खऱ्या आयुष्यातही स्पर्म डोनेट केले आहे. चेन्नईमध्ये राहणाऱ्या एका चाहत्याच्या विनंतीवरून त्याने त्याचे स्पर्म डोनेट (Donate Sperm) केल्याचे अभिनेत्याने त्याच्या एका मुलाखतीत सांगितले होते. मनीष अभिनेत्री सृष्टी रोडेसोबतच्या त्याच्या अफेअर आणि ब्रेकअपमुळे चर्चेत होता.

Continues below advertisement

आयुषमान खुराना

बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाने  (Ayushmann Khurrana) त्याच्या पहिल्या चित्रपट 'विकी डोनर' मध्ये स्पर्म डोनरची भूमिका साकारली होती. पण या अभिनेत्याने खऱ्या आयुष्यातही शुक्राणू दान केले आहेत. अभिनेत्याने सांगितले होते की, जेव्हा तो 20 वर्षांचा होता तेव्हा त्याने त्याचे शुक्राणू दान केले होते. नंतर 'विकी डोनर' या चित्रपटात काम केले. या अभिनेत्याला त्याच्या पदार्पणाच्या चित्रपटासाठी पुरस्कार देखील मिळाला.

शोमधील टास्क जिंकण्यासाठी स्पर्म डोनेट केले

आयुषमान खुराणा  (Ayushmann Khurrana) यानी सांगितले होते की, 'रोडीज' या रिअॅलिटी शोमध्ये (या शोमधून अभिनेत्याने पदार्पण केले होते) ऑडिशन दरम्यान त्याला शुक्राणू दान करण्याचे काम देण्यात आले होते आणि त्यानी जिंकण्यासाठी शुक्राणू दान केले होते.