Shani Vakri 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला (Shani Dev) सर्वाग क्रूर आणि पापी ग्रह म्हणतात. या व्यतिरिक्त शनी (Lord Shani)हा कर्मफळदाताचा कारक देखील आहे. शनी प्रत्येक राशीच्या लोकांना आपल्या कर्मानुसार फळ देतोय.शनीच्या दंडाने सर्व 12 राशींपैकी काही राशींच्या लोकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. नुकताच शनीने मीन राशीत प्रवेश केला आहे. 2027 पर्यंत शनी याच मीन राशीत असणार आहे. तर, 13 जुलै रोजी सकाळी 09 वाजून 26 मिनिटांनी शनी मीन राशीत वर्क्री होणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांना या काळात चांगलाच लाभ मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
शनी 138 दिवसांपर्यंत वक्री अवस्थेत असतात. त्यामुळे 13 जुलैला वक्री झाल्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी शनी मार्गी होणार आहे. शनीची उल्टी चाल अनेक राशींसाठी भाग्यशाली तर काही राशींसाठी संकट निर्माण करु शकते.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या सातव्या चरणात शनी वक्री होणार आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांना अनेक प्रकारे लाभ मिळू शकतो. तुमच्या व्यवसायात तुमची चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, धनसंपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. पार्टनरशिपमध्ये देखील तुम्ही व्यवसाय सुरु करु शकता. इतकंच नव्हे तर या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ देखील मिळणार आहे. नातेसंबंध मजबूत राहतील. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन रमेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री चाल फार अनुकूल ठरणार आहे. या राशीच्या तिसऱ्या चरणात शनी उल्टी चाल चालणरा आहेत. त्यामुळे तुम्हाला नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. या काळात तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. अन्यथा तुमच्या जवळची माणसं तुमच्यापासून दुरावू शकतात. तसेच, भावा-बहिणींमधील संबंध पार दृढ असतील. लवकरच यात्रेला जाण्याचा शुभ योग जुळून येणार आहे.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री चाल फार लाभदायक ठरणरा आहे. या राशीच्या लग्न भावात शनी वक्री होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे. या काळात परदेशी नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या लोकांना खास लाभ मिळणार आहे. तुमच्या पार्टनरबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवू शकता. तसेच, तुमच्या करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. धैर्याने तुम्ही प्रत्येक काम पूर्ण कराल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
