Ek Villain Returns Box Office Collection Day 5 : मोहित सुरीनं (Mohit Suri) दिग्दर्शित केलेल्या एक व्हिलेन रिटर्न्स (Ek Villain Returns) या चित्रपटाला प्रेक्षकांची फरशी पसंती मिळत नाहीये, असं दिसत आहे. कारण हा चित्रपट ऑडियन्सला इंम्प्रेस करु शकला नाही. एक व्हिलन रिटर्न्समध्ये जॉन अब्राहम (John Abraham), अर्जुन कपूर (Arjun kapoor), तारा सुतारिया (Tara Sutaria) आणि दिशा पाटनी (Disha Patani) या कलाकारांनी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 29 जुलै रोजी रिलीज झाला होता. वीकेंडला या चित्रपटानं चांगली कमाई केली पण त्यानंतर मात्र या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये घसरण झाली आहे. 


पाहा कलेक्शन:


एक व्हिलेन रिटर्न्स हा चित्रपट 50 कोटींच्या क्लबमध्ये देखील सामील झाला नाही.  एका रिपोर्टनुसार, या चित्रपटानं पाच दिवसांमध्ये एकूण 29 कोटींची कमाई केली आहे. ‘एक व्हिलन रिटर्न्स’ने चौथ्या दिवशी 3.02 कोटी रुपये इतके कलेक्शन केले आहे. 'एक व्हिलन रिटर्न्स'ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 7.05 कोटींची कमाई केली, तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 7.47 कोटी कमावले आहेत. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 9.02 कोटींचा गल्ला जमवला आहे. 


एक व्हिलन रिटर्न्स हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपटातील सर्व स्टार्स खलनायकाच्या भूमिकेत दिसले आहेत. ग्रे कॅरेक्टर असणाऱ्या या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत नाहीये. पण चित्रपटांमधील गाण्यांना मात्र प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. किच्चा सुदीपच्या विक्रांत रोणा या चित्रपटासोबत 'एक व्हिलन रिटर्न्स' ची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. विक्रांत रोणा हा चित्रपट देखील सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 


'एक व्हिलन रिटर्न्स' चित्रपटाचा दिग्दर्शक असलेल्या मोहित सुरीचे ‘मलंग’ (2020) , ‘हाफ गर्लफ्रेंड’(2017), ‘हमारी अधूरी कहानी’(2015) हे तीन चित्रपट फ्लॉप ठरले. आता जर ‘एक विलेन रिटर्न्स’ या त्याच्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नाही.


हेही वाचा: