KGF 2 : साऊथ सुपरस्टार यशचा ‘KGF 2’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. यश (Yash) आणि संजय दत्तचा (Sanjay Dutt) जबरदस्त अभिनय, दमदार अॅक्शन आणि डायलॉग्स प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहेत. या चित्रपटाने अवघ्या प्रेक्षक वर्गाच्या मनावर गारुड केले आहे. या चित्रपटाला देशभरातून तुफान प्रतिसाद मिळत आहे. यशचा ‘केजीएफ 2’ हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.


'केजीएफ 2' चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. 2018मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ’ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. यश व्यतिरिक्त या चित्रपटात संजय दत्त, रवीना टंडन आणि श्रीनिधी शेट्टी देखील मुख्य भूमिकेत दिसले आहेत. या चित्रपटातील मुख्य अभिनेता यशच्या दमदार अभिनयाने लोकांना त्याचे वेड लावले आहे. यशच्या दमदार हिंदी आवाजावर देखील प्रेक्षकांनी खूप टाळ्या वाजवल्या आहेत.  यशला हिंदीत आवाज देण्याचं काम एका मराठमोळ्या डबिंग कलाकाराने केले आहे.


कोण आहे हा कलाकार?


‘KGF 2’च्या हिंदी व्हर्जनसाठी यशला आवाज डबिंग कलाकार सचिन गोळे (Sachin Gole) यांनी दिला आहे. याआधी डबिंग आर्टिस्ट सचिन गोळे यांनी ‘KGF’लाही आपला आवाज दिला होता. इतकंच नाही, तर सचिन गोळे यांनी आतापर्यंत अनेक साऊथ चित्रपटांना आपला आवाज दिला आहे.



हिरो बनायला आला अन् डबिंग आर्टिस्ट म्हणून गाजला!


सचिन गोळे यांनी त्यांच्या एका मुलाखतीत म्हटले होते की, ते अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आले होते. या दरम्यान त्यांनी खूप संघर्ष केला. मुंबईत आल्यावर त्यांनी काही काळ एका बॅंकेत नोकरी केली. दरम्यान त्यांना मनोरंजन विश्व खुणावत होते. कामाच्या शोधात असताना त्यांची ओळख काही डबिंग कलाकारांशी झाली. इथूनच त्याच्या या प्रवासाची सुरुवात झाली. सचिन यांनी आजपर्यंत अनेक दक्षिणात्य चित्रपटांना आपला आवाज दिला आहे.  


हेही वाचा :