Drishyam 3 Box Office Collection Day 9: मोहनलालचा (Mohanlal) क्राइम थ्रिलर 'दृश्यम 3' (Drishyam 3)  या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. हा सिनेमा 21 मे 2026 रोजी सिनेमागृहात रिलीज झााला. 'दृश्यम' आणि 'दृश्यम 2' (Entertainment) या सिनेमांना मिळालेल्या घवघवीत यशानंतर 'दृश्यम 3'या सिनेमालाही प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.  हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) उत्कृष्ट कामगिरी करत आहे. पहिल्या आठवड्यात दमदार कमाई केल्यानंतर आता या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केला आहे.   दरम्यान, या सिनेमानं प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी, म्हणजेच दुसऱ्या शुक्रवारी किती कोटी रुपयांची कमाई केली? जाणून घेऊयात.

Continues below advertisement

शुक्रवारी अर्थात प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी या सिनेमानं किती कोटींचा गल्ला जमवला? (Drishyam 3 crosses 84 crore in nine days)

मोहनलाल अभिनीत आणि जीतू जोसेफ दिग्दर्शित ब्लॉकबस्टर फ्रँचायझी 'दृश्यम'च्या तिसऱ्या भागानेही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हा सिनेमा पहिल्या दिवसापासून सातत्याने कमाई करत आहे. या सिनेमानं 15.75 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन करुन धमाकेदार सुरुवात केलीये. पहिल्या वीकेंडमध्येही या सिनेमानं चांगली कमाई केली. वीकेंडनंतर सिनेमाचा वेग थोडा मंदावला जरी असला तरी,  पहिल्या आठवड्यातील कमाई 81.95 कोटी होती. दरम्यान, या सिनेमानं आता दुसऱ्या आठवड्यात एन्ट्री केली आहे.  

'दृश्यम 3' च्या प्रदर्शनाच्या नवव्या दिवशीच्या कमाईत थोडी घट झाली असल्याचं पाहायला मिळत आहे.  सॅनिल्कच्या अर्ली ट्रेंडच्या आकडेवारीनुसार,  'दृश्यम 3'ने प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या शुक्रवारी या सिनेमाने ४ कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.  म्हणजेच 9 दिवसांत या सिनेमानं एकूण 84.77 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.  

Continues below advertisement

 

मोहनलालनं मोडला आपल्याच सिनेमाचा रेकॉर्ड (Mohanlals Crime Thriller Drishyam 3)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'दृश्यम 3' या सिनेमानं  मोहनलालच्याच  'पुलिमुरुगन' या सिनेमाच्या 76.67 कोटी रुपयांच्या नेट कलेक्शनला मागे टाकले आहे. आता हा सिनेमा मोहनलालचा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत हा सिनेमा आता केवळ 2,524 कोटी स्क्रीन्सवर प्रदर्शित होत आहे. दरम्यान,  हा सिनेमा भारतात लवकरच 100 कोटींचा टप्पा ओलांडेल, यात काही शंका नाही. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

माझ्या स्कूल यूनिफॉर्मवर...; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला पहिल्यांदा मासिक पाळी आलेला 'तो' किस्सा

ABP माझाच्या बातम्या LIVE..