Documentary on Ram Mandir : राम मंदिरासाठी (Ram Mandir) करण्यात आलेले आंदोलन तसेच त्यावेळी लोकांनी केलेला संघर्ष आता एका लघुपटाद्वारे मांडण्यात येणार आहे. या डॉक्यूमेंट्रीमध्ये 1528 पासून ते राम मंदिराच्या निर्मितीपर्यंतच्या कालावधीमध्ये घडलेल्या सर्व घटना दाखवण्यात येणार आहेत. या डॉक्यूमेंट्रीचा उद्देश हा राम मंदिराचा गेल्या 500 वर्षांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा आहे. या डॉक्यूमेंट्री चित्रपटामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिरामध्ये पूजा केल्याचे दृष्य देखील दाखवण्यात येणार आहे.
प्रसार भारती करणार डॉक्यूमेंट्रीची निर्मिती
डॉक्यूमेंट्रीच्या बारकाव्यांकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या मार्गदर्शनाखाली डॉक्युमेंट्री फिल्म बनवण्यात येत आहे. प्रसार भारतीनेही या माहितीपटावर काम करण्यास सुरुवात केली आहे. राम मंदिर संघर्ष, आंदोलनापासून आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मंदिर उभारणीपर्यंतची प्रत्येक घटना माहितीपटात मांडण्यात येणार आहे. या डॉक्यूमेंट्रीच्या माध्यमातून राम मंदिरासाठी करण्यात आलेला संघर्ष हा पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्यात येणार आहे. मंदिर बांधणीशी संबंधित प्रत्येक पैलू हे लोकांना डॉक्युमेंटरीमध्ये पाहायला मिळणार आहेत. यासाठी राम मंदिर ट्रस्ट हे मंदिराच्या निर्माणाच्या प्रत्येक टप्प्याची व्हिडिओग्राफी करत आहेत.
मंदिराच्या सरचिटणीसांनी दिली माहिती
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले, प्रसार भारती सध्या या डॉक्युमेंट्रीवर काम करत आहे. प्रसार भारती जेव्हा चित्रपट बनवेल तेव्हा आम्ही तो पाहू. त्यामधील काही माहिती चुकणार नाही, याकडे आम्ही विशेष लक्ष देणार आहोत. ही डॉक्युमेंट्री समाजात प्रेम आणि आपुलकी वाढवण्याचे काम करेल. तसेच येणाऱ्या पिढ्यांना योग्य माहिती देण्याचा उद्देश या डॉक्युमेंट्रीचा आहे. ही डॉक्युमेंट्री कुठे रिलीज केली जाणार आहे? याबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
हेही वाचा: