Doctor Strange 2: मार्व्हल स्टूडियोजचा 'डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस' (Doctor Strange In The Multiverse Of Madness) हा चित्रपट पुढच्या महिन्यामध्ये प्रदर्शित होणार आहे.  ‘डॉक्टर स्ट्रेंज’ हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं 'ओपनिंग-डे'ला 8.5 कोटी डॉलरची कमाई केली होती. आता या चित्रपटाचा सिक्वेल म्हणजेच  'डॉक्टर स्ट्रेंज-2'  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आता या चित्रपटाच्या प्री-बुकींगला देखील सुरूवात झाली आहे. 


‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ या चित्रपटाच्या प्री-बुकींला सुरूवात झाल्यानंतर हा चित्रपट अॅडवान्स बुकिंगमधून 19 कोटी डॉलरची कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे.  त्यामुळे हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकतो. सहा मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 






‘डॉक्टर स्ट्रेंज 2’ म्हणजेच  ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ हा चित्रपट अमेरिकेसोबतच भारतामध्ये देखील सहा मे रोजी प्रदर्शित होणार आहे.  भारतामध्ये हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगु आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 


हेही वाचा :