Dnyanada Ramtirthkar Casting Couch Experience : मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर (Dnyanada Ramtirthkar) ही लवकरच एका हिंदी वेब सिरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्ञानदा ही स्टार प्रवाह वाहिनीवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत झळकली होती. तिची अपूर्वा वर्तक ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरली. आता तिची वर्णी हिंदी वेब सिरिजमध्ये लागील आहे. 


अभिनयाचा सुंदर प्रवास सुरु असतानाच या अभिनेत्रीला देखील कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता. एका तेलुगु सिनेमासाठी तिला Compromise करण्यासाठी सांगितलं होतं, असा अनुभव तिने सांगितला. ज्ञानदाने नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने याविषयी भाष्य केलं आहे. 


काही गोष्टींना नाही म्हणणं गरजेचं असतं - ज्ञानदा


ज्ञानदाने तिचा अनुभव शेअर करताना म्हटलं की, खरंतर मला असा अनुभव कधी आला नाही. पण एका तेलुगु सिनेमासाठी मला फोन आला होता. त्यावेळी त्या फोनवरील व्यक्तीने मला तुला Compromise करावं लागेल असं म्हटलं. मी काय त्या व्यक्तीला पुढे जास्त एन्टरटेन केलं नाही. कारण काही गोष्टी या आपल्या आपण ठरवणं जास्त चांगलं असतं. आपले मुद्दे ठामपणे समोरच्या व्यक्तीला सांगणं देखील तितकचं गरजेचं असतं. तसंच काही गोष्टींना नाही म्हणणंही तितकचं महत्त्वाचं असतं. 


'दुसरीकडे जाऊन मला अशा फालतू गोष्टी करण्याची गरज नाही'


पुढे तिने म्हटलं की, प्रेक्षकांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. मुळात मराठी प्रेक्षकांसारखे प्रेक्षक मला कुठेही सापडणार नाही. इथे मला एवढं प्रेम दिलं जातं, मग मला दुसरीकडे जाऊन अशा फालतू गोष्टी करण्याची गरजच वाटत नाही. जेव्हा तुमची कलाकार म्हणून सुरुवात होत असते, त्यावेळी अशा गोष्टींना तुम्हाला समोरं जावं लागतं. पण मराठीत अशा गोष्टी नाही घडत. मला तो फोन जेव्हा आला त्यावेळी मी त्याला सुरुवातीला चार शब्द सुनावले आणि तो नंबर ब्लॉक केला. 


ज्ञानदाची कमांडर करण सक्सेना ही हिंदी वेब सिरिज लवकरच प्रेक्षकाच्या भेटीला येणार आहे. या सिरिजमध्ये तिने एका कोळी मुलीची भूमिका निभावली आहे.  






ही बातमी वाचा : 


Bigg Boss Marathi : मालिकांमधील कलाकारांची बिग बॉसच्या घरात होणार एन्ट्री? 'या' अभिनेत्यांच्या नावाची जोरदार रंगली चर्चा