Divyanka Tripathi Pregnancy Baby Name Ideas: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी सध्या आपल्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. दिव्यांका आणि तिचा पती विवेक दहिया त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यास सज्ज झाले आहेत.  अलिकडेच अभिनेत्रीचे बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते.  दिव्यांका आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावरुन गरोदरपणाचे अपडेट्स शेअर करत असते. दिव्यांकाचा पती विवेकने अलिकडेच एक व्लॉग शेअर केलाय.  यात दोघांमध्ये बाळाच्या नावावरुन चर्चा सुरु असते.  घरात नवीन पाहुणा येणार असल्यामुळे  दोघांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. सध्या त्यांचा व्लॉग सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Continues below advertisement

दिव्यांका आणि तिचा पती बाळाचे स्वागत करण्यास सज्ज झाले आहेत

व्लॉगमध्ये विवेक म्हणतो की,    'मला जोई हे नाव खूप आवडतं. पण दिव्यांकाला हे नाव आवडलं नाही. म्हणून मला आता कळत नाही की,  काय नाव ठेवू'.  यावर दिव्यांका म्हणते, 'मला असं वाटतं हे नाव जुनं झालं आहे.  त्यामुळे मला या नावाबद्दल फारशी खात्री नाही.  मी लहानपणी एक गाणं ऐकलं होतं, ज्यात कहकशा या शब्दाचा वापर झाला होता. मला ते नाव आवडलं होतं.  मुलगी  झाली तर, आपण या नावाचा विचार करु शकतो', असं दिव्यांका म्हणाली.

दरम्यान, विवेक म्हणतो, 'कीशा हे नाव कसं वाटतं?'  दिव्यांका मुलीच्या नावावरुन थोडी कन्फ्यूज होते.  पण ती मुलाचे नाव सजेस्ट करते.   'मुलासाठी रुद्राक्ष हे नाव मला खूप आवडतं.  परंतु, आम्ही अजून नाव ठरवू शकत नाही आहोत.   रुद्राक्ष हे नाव भगवान शिव  यांच्या नावांपैकी एक आहे. पण रुद्राचा अर्थ क्रोध असा होतो. त्यामुळे मुलाचं ते नाव मी ठेवणार नाही', असं दिव्यांका म्हणाली. 

Continues below advertisement

 

दोघांमध्ये मुलीचं नाव 'रिदम' या नावावर चर्चा होते. विवेक म्हणतो, 'जर मुलगी झाली तर रिदम हे नाव आपण ठेवू शकतो. कारण आपण दोघांनाही हे नाव आवडलं आहे', सध्या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  नेटकऱ्यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

भैय्यांच्या संपाला शिव ठाकरेचा विरोध; स्वत:ची Tata Harrier कार सेवेत उतरवली, म्हणाला...