Surya Nakshatra Parivartan 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्याचं नक्षत्र परिवर्तन (Surya Nakshatra Parivartan)हे सूर्याच्या संक्रमणाप्रमाणेच महत्त्वाचं मानलं जातं. असं म्हणतात की, ज्या राशींवर सूर्यदेवाची कृपा असते त्या राशींचं नशीब सोन्यासारखं उजळतं. खरंतर, द्रिक पंचांगानुसार, सूर्य देव 28 एप्रिल रोजी म्हणजेच उद्या नक्षत्र परिवर्तन करणार आहे. सूर्याचा शुक्राच्या भरणी नक्षत्रात प्रवेश होणार आहे. तर, 11 मे पर्यंत तो याच राशीत स्थित असणार आहे.
भरणी नक्षत्राचा स्वामी शुक्र ग्रह आहे. तसेच, सूर्य-शुक्र ग्रहात शत्रुत्वाचं नातं आहे. त्यामुळे काही राशींच्या जीवनात चढ-उतार येऊ शकतात. काही राशींना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने कोणत्या राशींना पुढचे 14 दिवस सावध राहावं लागेल ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्याचं नक्षत्र परिवर्तन थोडं आव्हानात्मक ठरणार आहे. या काळात तुम्हाला ऑफिसमधील सहकाऱ्यांकडून थोडा मानसिक तणाव जाणवू शकतो. तसेच, पैशांच्या बाबतीत तुम्हाला आर्थिक अडचणी जाणवतील. त्यामुळे वेळोवेळी सतर्क राहा. तसेच, सध्या गुंतवणुकीचा विचार करु नका.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांना या काळात मानसिक ताण जाणवेल. कामावर तुम्ही थोडं लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांची अचानक बदली होऊ शकते. त्यामुळे तुमचा मानसिक ताण वाढेल. पैशांच्या बाबतीत तुम्हाला सावधानता बाळगण्याची गरज आहे. तसेच, आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी सूर्याचं नक्षत्र परिवर्तन आव्हानात्मक ठरणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिक दबाव जाणवेल. तसेच, तुमच्या खर्चात अचानकपणे वाढ होऊ शकते. तुम्हाला तुमच्या बजेटवर देखील नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. नोकरदार वर्गातील लोकांनी कामाच्या ठिकाणी सतर्क राहण्याची गरज आहे.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
