Nad Nad Ganpati Song : ‘चोरीचा मामला’, ‘भेटली ती पुन्हा’ तसेच आगामी ‘लव सुलभ’ अशा उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर स्वरूप स्टुडिओज् (Swaroup Studioss) आता ‘स्वरूप म्युझिक’ (Swaroup Music) या नव्याकोऱ्या युट्युब म्युझिक चॅनलद्वारे म्युझिक अल्बम क्षेत्रात पदार्पण करत आहेत. यंदाच्या गणेशोत्सवाचे औचित्य साधत ‘नाद नाद गणपती....’ (Nad Nad Ganpati) या गाण्यानं म्युझिक चॅनलचा शुभारंभ होत असून,  'जी करदा'सारखी अनेक हिट गाणी गायलेला विख्यात गायक दिव्या कुमारने (Divya Kumar) हे गाणे गायले आहे.


या गाण्यामुळे यंदाचा गणेशोत्सव नाकीच खास होणार आहे. गणपतीच्या जल्लोषाच्या माहोलात हे गाणे प्रेक्षकांसाठी खास पर्वणी ठरणार आहे. नुकताच या गाण्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या टीझरने प्रेक्षकांची आणि भक्तांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. या गाण्यात लाडक्या गणपती बाप्पाची झलक पाहायला मिळते आहे. शिवाय गणेशोत्सवादरम्यानचा जल्लोष देखील पाहायला मिळत आहे. बाप्पाचं गोजिरवाणं रूप पाहून सगळेच मोहित झाले आहेत.


पाहा गाणे :


 



दिव्या कुमारने दिला आवाज


दिव्या कुमार हे चित्रपट संगीतातले मोठे नाव आहे. हिंदी मराठी चित्रपटांसह त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही अनेक हिट गाणी गायली आहेत. तर, स्वरूप स्टुडिओजनेही आतापर्यंत उत्तम चित्रपट निर्मिती केली आहे. स्वरूप म्युझिकच्या प्रभाकर परब, सचिन नारकर, विकास पवार यांनी ‘नाद नाद गणपती...’ या गाण्याची निर्मिती केली आहे. विष्णु सकपाळ यांनी लिहिलेलं हे गाणं वरद-राजू या संगीतकार जोडीनं संगीतबद्ध केलं आहे. गाण्याचं संगीत संयोजन आणि प्रोग्रामिंग मॉन्टू गोसावी, राजू कुलकर्णी, वरद कुलकर्णी यांनी केले असून संगीत संयोजक रूपम भागवत आहेत.


नव्या दमाच्या कलाकारांसाठी नवा मंच


चित्रपट क्षेत्रानंतर स्वरूप स्टुडिओजने आता नव्या दमाच्या कलाकारांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी ‘स्वरूप म्युझिक’ हा स्वतंत्र युट्युब चॅनल सुरू केला आहे. ‘नाद नाद गणपती’ हा दमदार म्युझिक व्हिडीओच्या रुपाने येत्या 24 ऑगस्टला प्रेक्षकांसमोर येत आहे. दिव्या कुमार यांनी काही मराठी चित्रपटांसाठी गाणी गायली असली, तरी ‘नाद नाद गणपती...’ हा त्यांचा पहिलाच मराठी म्युझिक अल्बम आहे. त्यामुळे त्यांच्या जादुई आवाजासह उत्तम शब्द आणि संगीत असलेला हा म्युझिक व्हिडीओ यंदाच्या गणेशोत्सवाचं आकर्षण ठरेल हे नक्की.


हेही वाचा :


Entertainment News Live Updates 23 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!