Diljit Dosanjh Declare Not Any Concert In India: दिलजीत दोसांझच्या (Diljit Dosanjh) कॉन्सर्टने सध्या चाहत्यांना वेड लावलंय. भारतभर दिलजीतचे कॉन्सर्ट्स सुरु आहेत. पण याच लाईव्ह कॉन्सर्टच्या बाबतीत दिलजीतने एक मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे दिलजीत भारतात त्याचे कॉन्सर्ट्स न करण्याचा निर्णय दिलजीतने घेतला आहे. सध्या सोशल मीडियावर (Social Media) दिलजीतचा हाच व्हिडीओ बराच व्हायरल होतोय.
दिलजीतच्या या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसलाय. त्याचप्रमाणे त्याने त्याचा हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती देखील दिलजीतला सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जातेय. त्यामुळे आता भारतात दिलजीतच्या फॅन्सच्या त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टचा अनुभवता घेता येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान दिलजीतने हा निर्णय का घेतला याविषयी स्वत: दिलजीतनेच सांगितलं आहे.
दिलजीतने असा निर्णय का घेतला?
दिलजीतने त्याच्या चंढीगडमधील कॉन्सर्ट दरम्यान ही घोषणा केली आहे. त्याच्या याच कॉन्सर्टमधला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये दिलजीतने म्हटलं की, जोपर्यंत भारतातील कॉन्सर्ट इन्फ्रास्ट्रक्चर सुधारत नाही तोपर्यंत मी पुन्हा भारतात कॉन्सर्ट करणार नाही.भारतात लाईव्ह शोसाठी पायाभूत सुविधा नाहीत. ही एक मोठी कमाईची जागा आहे. त्यातून अनेकांना रोजगारही मिळतो. कृपया यावर तुम्ही लक्ष केंद्रीत करा.
दिलजीतने पुढे म्हटलं की, मी स्टेजच्या मध्यभागी उभा राहण्याचा प्रयत्न करेन पण त्याभोवती बरीच गर्दी पसरली आहे. इथली परिस्थिती सुधारेपर्यंत मी इथे शो करणार नाही. आम्हाला त्रास देण्याऐवजी पायाभूत सुविधा सुधारा.
दिलजीतवर कॉन्सर्टच्या तिकिटांचा काळाबाजार केल्याचा आरोप
शोची तिकिटे पुन्हा जास्त किंमतीत विकल्यानंतर दिलजीतच्या टीका झाली होती. तर अनेकांनी पंजाबी अभिनेता-गायकावर त्यांच्या कॉन्सर्टच्या तिकिटांचा काळाबाजार केल्याचा आरोपही केला आहे. भारतातील दिलजीत दोसांझच्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पंजाबी सुपरस्टारने दिल्लीहून आपल्या दिल लुमिनाटी टूरची शानदार सुरुवात केली होती. यानंतर त्याने जयपूर, हैदराबाद, अहमदाबाद, लखनौ, पुणे, कोलकाता आणि बेंगळुरू येथे चमकदार कामगिरी केली.