Dhurandhar Record In Pakistan: 'धुरंधर'चा (Dhurandhar Movie) जगभरात डंका वाजतोय आणि फिल्म धुवांधार कलेक्शन करतेय. अक्षय खन्ना (Akshaye Khanna), रणवीर सिंह (Ranveer Singh) स्टारर फिल्म 6 आखाती देशांमध्ये रिलीज करण्यात आलेली नाही आणि 'धुरंधर' (Dhurandhar) पाकिस्तानातही रिलीज झालेलान नाही. तरीसुद्धा पाकिस्तानात 'धुरंधर'ची क्रेझ पाहायला मिळतेय. अधिकृतरित्या 'धुरंधर' पाहायला मिळणार नाही, म्हणून अनधिकृतरित्या पाकिस्तानी 'धुरंधर' पाहत आहेत. अगदी लपूनछपून, गपचूप 'धुरंधर' पाकिस्तानात पाहिला जात आहे. पाकिस्तानी नागरिक मोठ्या संख्येनं पायरेटेड साईट्सवरुन सिनेमा डाऊनलोड करुन पाहत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 'धुरंधर' गेल्या 20 वर्षांत पाकिस्तानातील सर्वाधिक पायरेटेड करण्यात आलेला बॉलिवूड सिनेमा बनला आहे.  

Continues below advertisement

'धुरंधर' पाकिस्तानविरोधी सिनेमा असल्यानं आखाती देशांमध्ये प्रदर्शित करण्यात आलेला नाही. तर, पाकिस्तानमध्ये भारतीय कलाकार आणि चित्रपटांवर बंदी आहे, म्हणूनच हा चित्रपट तिथेही प्रदर्शित झालेला नाही. पण, सध्याची जगभरातील 'धुरंधर'ची क्रेझ पाहता. दरम्यान, या सर्व गोष्टींचा 'धुरंधर'च्या बॉक्स ऑफिसवर कोणताही विशेष परिणाम झालेला नाही. उलट पाकिस्तानमधील लोक सिनेमा त्यांच्या देशाविरोधात असूनही तो पाहण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. पाकिस्तानी पायरेटेड साइट्सवरून 'धुरंधर' डाऊनलोड करुन पाहत आहेत. 

पाकिस्तानात 'धुरंधर'चा धुमाकूळ 

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, गेल्या 12 दिवसांत पाकिस्तानमधील पायरेटेड साइट्सवरून 'धुरंधर' जवळजवळ 20 लाख वेळा डाऊनलोड करण्यात आला आहे. प्रेक्षक रणवीर सिंहचा स्पाय-थ्रिलर टॉरेंट, व्हीपीएन आणि बेकायदेशीर लिंक्सद्वारे पाहतोय. यासह, 'धुरंधर' गेल्या 20 वर्षांत पाकिस्तानमधील सर्वात पायरेटेड बॉलिवूड चित्रपट बनला आहे. पायरसीच्या बाबतीत रणवीर सिंहच्या चित्रपटानं शाहरुख खानच्या 'रईस" आणि '२.०' सारख्या मागील हिट चित्रपटांना मागे टाकलं आहे.

'धुरंधर'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन

'धुरंधर' 5 डिसेंबर 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले आहेत आणि तरीही तो दररोज दुहेरी अंकात कमाई करतोय. फक्त 13 दिवसांत, चित्रपटानं भारतीय बॉक्स ऑफिसवर 454.20 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'धुरंधर'नं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 600 कोटी रुपयांचा टप्पाही ओलांडला आहे.

'धुरंधर'ची तगडी स्टारकास्ट 

अक्षय खन्ना, रणवीर सिंह स्टारर फिल्म 'धुरंधर'ला आदित्य धरनं दिग्दर्शित केली आहे. फिल्ममध्ये सारा अर्जुन, सौम्या टंडन, अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि आर. माधवनसारखे कलाकार झळकले आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Akshaye Khanna Shocking Reaction On Dhurandhar Success: '...फरक नाही पडत', 'धुरंधर'मुळे होणाऱ्या कौतुकावर पहिल्यांदाच बोलला अक्षय खन्ना; एकाच वाक्यात विषय संपवला