Akshaye Khanna Shocking Reaction On Dhurandhar Success: सध्या सोशल मीडियावर (Social Media) सगळीकडे फक्त आणि फक्त 'धुरंधर' सिनेमा (Dhurandhar Movie), त्यात झळकलेला अक्षय खन्ना (Akshaye Khanna) आणि त्याच्या कौतुकाच्या पोस्ट पाहायला मिळतायत. 'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नानं गँगस्टर रहमान डकैतची (Rehman Dakiat) भूमिका साकारली आहे. त्याची भूमिका एवढी व्हायरल झाली की, सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगल्या आहेत. चित्रपटातील इतर कलाकारांनी चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. दरम्यान, अक्षय खन्नानं अद्याप सार्वजनिकपणे यावर कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळे सध्या एक प्रश्न जोरदार चर्चेत आहे की, अक्षय खन्नाला त्याची भूमिका सर्वांना आवडलीय आणि त्याच्या सर्वजण प्रेमात पडलेत, याची जाणीव आहे का?
सुप्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टरनं अक्षय खन्नानं उधळली स्तुतीसुमनं
'धुरंधर' सिनेमात रहमान डकैतच्या भूमिकेसाठी अक्षय खन्नाची निवड बॉलिवूडचा सुप्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रानं केलेली. अशातच आता अक्षय खन्नावर चोहीकडून कौतुकाचा वर्षाव होतोय. त्यातच ज्यानं अक्षय खन्नाला रहमान डकैत साकारण्यासाठी निवडलं त्याच मुकेश छाब्रानं अक्षयचं कौतुक केलंय. मिस मालिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मुकेश छाब्रानं अक्षयच्या अभिनय कौशल्याचं तोंडभरुन कौतुक केलंय. मुकेश छाब्रा म्हणाला की, "अक्षय खन्ना हा असा अभिनेता आहे, त्याची शैली इतकी अनोखी आहे की, ती कधीही कुणाचं तरी पाहून केलेली किंवा कॉपी केलेली वाटत नाही. तो त्याच्या प्रत्येक कामात स्वतःचा एकतरी पैलू आणतोच आणि आपली छाप सोडतो. तो ते इतक्या विश्वासार्हतेनं करतो की, तुम्हाला त्याच्यावर प्रेम करायला तो भाग पाडतो..."
'धुरंधर'च्या यशावर काय बोलला अक्षय खन्ना? (Akshaye Khanna Reaction On Dhurandhar Movie)
मुकेश छाब्रानं मुलाखतीत बोलताना सांगितलं की, 'धुरंधर'च्या यशाबाबत अक्षय खन्नाशी त्याचं बोलणं झालं. त्यानं सांगितलं की, "मी अक्षय खन्नाशी बोलत होतो आणि त्याला काय चाललंय त्याबद्दल काहीच माहीत नव्हतं... तो फक्त एवढंच म्हणाला की, "त्यानं जास्त फरक पडत नाही, पण खरंच मजा आली..." त्याला माहीत आहे की, तो त्याच्या कामावर किती प्रेम करतो... मी सेटवर जितका वेळ होतो, तेव्हा मला त्याची काम करण्याची पद्धत कळाली... तो त्याच्याच स्पेसमध्ये राहतो, स्वतःच्या वलयात तो खूप सावधानपणानं सांभाळतो... स्वतःचा सीन तो कित्येकदा वाचतो आणि पूर्णपणे तयार असतो. मला वाटतं की, हीच जादू नंतर त्याच्या कामात दिसते..."
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नानं गँगस्टर रहमान डकैतीची भूमिका साकारली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून, त्याचा अभिनय देशभर चर्चेचा विषय बनलाय. अनेक प्रेक्षकांचं म्हणणं आहे की, त्यानं चित्रपटातील मुख्य अभिनेता रणवीर सिंहला मागे टाकलं आहे. त्याच्या एका एन्ट्री सीनमध्ये 'FA9LA' मधील गाण्यात त्यानं केलेल्या डान्स स्टेप्स प्रचंड व्हायरल झाल्या आणि प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. सर्व प्रशंसा आणि यश असूनही, अक्षय खन्ना मात्र, यापासून पूर्णपणे अनभिज्ञ आहे. त्यानं अलिकडेच त्याच्या अलिबाग येथील घरी वास्तुशांती हवन केलंय.
दरम्यान, आदित्य धर दिग्दर्शित, हा स्पाय अॅक्शन थ्रिलर चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून रेकॉर्ड तोडत आहे. या चित्रपटाने कोणत्याही भारतीय चित्रपटासाठी सर्वोत्तम दुसरा आठवडा रेकॉर्ड केला. फक्त 12 दिवसांत, 'धुरंधर' 2025 चा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला आहे, त्याने 'सैयारा', 'कुली' आणि 'वॉर 2' ला मागे टाकलं आहे. या चित्रपटानं जगभरात सुमारे 634 कोटी रुपये कमावले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :