Dhurandhar Box Office Collection Day 4: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता रणवीर सिंहनं (Ranveer Singh) सर्वांना मागे टाकलंय. रणवीर सिंह, अक्षय खन्ना (Akshaye Khanna) यांच्या 'धुरंधर' सिनेमानं (Dhurandhar Movie) बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) अक्षरशः आग लावली आहे. बऱ्याच काळानंतर रणवीर सिंहचा सिनेमा आला आणि त्यामुळे बॉक्स ऑफिसवर चाहत्यांची झुंबड उडाली. 'धुरंधर' पाहिलेला प्रत्येकजण त्याचं कौतुक करतोय. पण, खरंतर 'धुरंधर'मध्ये रणवीरपेक्षाही चाहत्यांना अक्षय खन्ना चाहत्यांना जास्त आवडलाय. अक्षय खन्नाचे डायलॉग्स फार कमी आहेत, पण, त्याचे एक्सप्रेशन्स अन् त्यानं त्याच्या डोळ्यांनी केलेला अभिनया सर्वांना खिळवून ठेवतो. याव्यतिरिक्त आर. माधवन, संजय दत्तही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर, फक्त 20 वर्षांच्या छोट्याशा सारा अर्जुननं तर सिनेमाला चार चाँद लावलेत. 

Continues below advertisement

'धुरंधर'नं रिलीज झाल्यानंतरचा विकेंड तर गाजवला, पण त्याची खरी परीक्षा होती ती, सोमवारी म्हणजेच, आठवड्याच्या पहिल्या दिवशी. पण, 'धुरंधर' मंडे टेस्टमध्येही चांगल्या कमाईनं पास झाला आहे. 'धुरंधर' बॉक्स ऑफिसवर एवढी धुवांधार कमाई करतोय की, या सिनेमानं सलमान खानच्या 'सिकंदर'लाही फक्त चारच दिवसांत मागे टाकलं आहे. चौथ्या दिवशी सिनेमानं किती कमाई केली? सविस्तर पाहूयात... 

चौथ्या दिवसाचं कलेक्शन 

'धुरंधर'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, चित्रपटानं फक्त तीन दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडलाय. जर याच वेगानं 'धुरंधर' कमाई करत राहिला, तर तो वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक बनू शकतो. SACNILC च्या अहवालानुसार, 'धुरंधर'नं सोमवारी अंदाजे 23 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं, ज्यामुळे त्याची एकूण कमाई 126 कोटी रुपये झाली. मंगळवारीही अशीच कमाई करत राहिल्यास तो फक्त पाच दिवसांत 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल.

Continues below advertisement

'सिकंदर'ला टाकलं मागे 

रणवीर सिंहच्या 'धुरंधर'नं फक्त चार दिवसांत सलमान खानच्या 'सिकंदर'ला मागे टाकलंय. बॉलिवूड हंगामाच्या अहवालानुसार, 'सिकंदर'चा आयुष्यभराचा कलेक्शन 103.45 कोटी रुपये आहे आणि भारतात त्याचा एकूण कलेक्शन 122.14 कोटी रुपये आहे. 'धुरंधर'नं फक्त चार दिवसांत हा रेकॉर्ड मागे टाकलाय. आता धुरंधर कोणत्या इतर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, 'धुरंधर'मध्ये रणवीर सिंहसोबत सर्वाधिक प्रशंसा मिळवणारा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अक्षय खन्ना आहे. 'धुरंधर'मध्ये रणवीर सिंह, अर्जुन रामपाल, संजय दत्त, अक्षय खन्ना आणि आर. माधवन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अक्षय खन्नानं या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Dhurandhar Review: धुवांधार 'धुरंधर'; डायलॉग्स वाह रे वाह अन् स्टोरी लाईनची तर बातच और... शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा सिनेमा!