Dhurandhar 2 OTT Platform Revealed After Teaser Launch: धुरंधर चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर लवकरच या चित्रपटाचा दुसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. धुरंधर 2 चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, या चित्रपटात मुख्य भूमिकेत रणवीर सिंह झळकणार आहे. धुरंधर हा चित्रपट आता आपल्याला नेटफ्लिक्सवर पाहता येईल. प्रेक्षक हमजा अली मजारीच्या भूमिकेत असणाऱ्या रणवीरच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. रिलीजच्या तीन आठवड्यात जगभरात 1000 कोटी रूपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर, आता या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चा आहे.
धुरंधर 2 चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट नेमका कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. या टीझरमध्ये धुरंधर: द रिव्हेंज थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर कुठे स्ट्रीम होईल, याची देखील माहिती दिली आहे. पहिल्या भागाप्रमाणे दुसरा भाग नेटफ्लिक्सवर प्रीमियर होणार नाही. त्याऐवजी सिक्वेलचा प्रीमियर जिओ हॉटस्टारवर होईल. नेटफ्लिक्सने पहिल्या भागाने स्ट्रीमिंग अधिकार विकत घेतले होते. 30 जानेवारीपासून या चित्रपटाने त्याचा स्ट्रीमिंग प्रवास सुरू केला.
धुरंधर 2 जिओ हॉटस्टारमध्ये होणार रिलीज
दरम्यान, धुरंधर 2च्या पहिल्या पोस्टवर आणि टीझरच्या शेवटी क्रेडिट्समध्ये जिओ हॉस्टारचा लोगो दिसत आहे. ज्यामुळे हा चित्रपट जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. धुरंधर 2 ची ओटीटी रिलीज तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
धुरंधर 2 पाच भाषांमध्ये होणार प्रदर्शित
जिओ स्टुडिओज निर्मित, धुरंधर: द रिव्हेंज 19 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये पाच भाषांमध्ये प्रदर्शित होईल. आदित्य धर दिग्दर्शित हा सिनेमा स्पाय अॅक्शन थ्रिलर चित्रपट असून, ज्योती देशपांडे आणि लोकेश धर यांनी हा चित्रपट निर्मित केला आहे. दरम्यान, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार का? हे लवकरच कळेल. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या: