Dhurandhar 2 OTT: आदित्य धर दिग्दर्शित व रणवीर सिंह अभिनीत बहुप्रतिक्षित 'धुरंधर 2 द रिव्हेंज'( Dhurandhar 2: The Revenge ) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ( Box Office) धुमाकूळ घातल्यानंतर, प्रदर्शनाच्या 73 व्या दिवशी तो ओटीटीवर प्रदर्शित( OTT Release) करण्यात आला. पहिला भाग नेटफ्लिक्सवर उपलब्ध असला तरी दुसऱ्या भागाचे डिजिटल राइट्स जिओ हॉटस्टारने विकत घेतल्याने 4 जून रोजी जिओ हॉटस्टारवर ( Jio Hotstar) हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र, OTT वर येताच अनेक प्रेक्षकांचा Jio हॉटस्टारच्या नव्या मार्केटिंग स्ट्रॅटजीमुळे रसभंग झाला. अनेक जण सोशल मीडियावर यावरून नाराजी व्यक्त करत आहेत.
धुरंधर चित्रपटाच्या प्रचंड लोकप्रियतेनंतर 'धुरंधर 2'ची प्रेक्षकांना प्रचंड आतुरता होती. हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार याची जगभरात चर्चा सुरू होती. चित्रपटाचा मेकर्सने जिओ हॉटस्टारवर चित्रपट प्रदर्शित केला, मात्र, थेट चित्रपट प्रदर्शित करण्याऐवजी त्यात स्ट्रिमिंगचे इतके ट्विस्ट टाकले की, यावरून प्रेक्षकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होताना दिसली. सोशल मीडियावर अनेकांनी ट्विट करत चित्रपटाचा आनंद घेता आला नसल्याचे म्हटलं.
धुरंधर 2 OTT वर आला, तरीही प्रेक्षक नाराज
'धुरंधर 2 द रिव्हेंज' चित्रपट 4 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला. जिओ हॉटस्टारवर या चित्रपटाचे लाईव्ह प्रीमियर आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये फ्री शोज सेगमेंट आणि कॉमेंट्री बॉक्सचाही पर्याय देण्यात आला होता. शिवाय चित्रपट पाहणाऱ्यांना प्रीमियम अनुभव कसा मिळेल यासाठी जिओ हॉटस्टारने आगळीवेगळी स्ट्रॅटजी केलेली. प्रेक्षकांना चित्रपट पाहता पाहता काही खाण्याची इच्छा झाली तर, स्विगीचा ऑप्शनही देण्यात आला होता. शिवाय एखाद्या मॅचचे किंवा कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रीमिंग होते, तेव्हा पाहणाऱ्यांना कमेंट करण्याचा जसा पर्याय असतो,तसा धुरंधर 2 पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही देण्यात आला होता. मात्र, अनेकांना जिओ हॉटस्टारची ही स्ट्रॅटजी रुचली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी चित्रपटाचा आनंद घेता आला नसल्याचे म्हटलं.
मुळात प्रचंड उत्सुकता असलेल्या या बहुप्रतिक्षित चित्रपटाचं ओटीटी प्रदर्शन निराशाजनक असल्याचं प्रेक्षक म्हणत आहेत. जिओ हॉटस्टारने हा चित्रपट थेट प्रदर्शित करायला हवा होता . जेणेकरून पाहणाऱ्याला त्याच्या सोयीने चित्रपट पाहता आला असता. एका प्रेक्षकाने लिहिलं ' यापेक्षा थेट प्रिमियर केलं असतं तर बरं झालं असतं. लाईव्ह स्ट्रीमिंग प्रीमियरचा खटाटोप कशासाठी हवा ? 'असा सवालही करण्यात आला. काहींनी चित्रपटाची प्रदर्शनाची वेळ 7 वाजता ठेवल्याने अनेकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत चित्रपट पाहता आला नाही.अशी तक्रार केली. दुसरीकडे जे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहत होते त्यांना अनेक व्यत्यय आल्याचेही काहींनी म्हटलं आहे. अतिशय उत्तम चित्रपट बनवूनही स्ट्रीमिंग करताना कोणत्याही ब्रेक शिवाय चित्रपट पाहण्याचा अनुभव खराब झाल्याचा अनेकांनी म्हटलं आहे.
जिओ हॉटस्टार ने 50 हून अधिक ब्रँड पार्टनर्स आणि तीस मिनिटांच्या फ्री शो इव्हेंटसह या चित्रपटाचे OTT प्रदर्शन केलं. 'रॉ ॲन्ड अनदेखा ' या खास टायटल ही त्यांनी याला दिलं होतं. चित्रपटात न दाखवलेले काही ओटीटीवर प्रेक्षकांना पाहता येणार असल्याने अनेकांची उत्सुकता वाढली होती. मात्र, 4 जूनला जे लाईव्ह स्ट्रीमिंग झालं ते आता नसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना व्यत्ययाशिवाय येता चित्रपट पाहता येणार आहे.
