Dharmendra Health Update: हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra News) यांचे निधन झाल्याच्या वृत्ताने मंगळवारी खळबळ उडाली. अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांची प्रकृती सोमवारी खालावली होती. त्यांना मुंबईच्या (Mumbai News) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्यामुळे धर्मेंद्र यांच्या चाहत्यांची चिंता वाढली होती. मात्र, मंगळवारी सकाळी अचानक सोशल मीडिया आणि अनेक वृत्तमाध्यमांनी अभिनेता धर्मेंद्र यांचे निधन झाल्याच्या बातम्या दिल्या. यावर हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक ज्येष्ठ अभिनेत्यांनी शोक व्यक्त केला. मात्र, त्यानंतर काहीवेळातच धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांनी हे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट केले.
धर्मेंद्र यांच्या पत्नी अभिनेत्री हेमा मालिनी आणि त्यांची मुलगी ईशा देओल यांनी धर्मेंद्र यांच्या निधनाचे वृत्त निखालस खोटे असल्याचे सोशल मीडियावरुन स्पष्ट केले. धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असून त्यामध्ये सुधारणा होत आहे, असे या दोघांनी सांगितले. या सगळ्यामुळे धर्मेंद्र यांच्या निधनाबाबत निर्माण झालेले संभ्रमाचे वातावरण दूर झाले आहे.
प्रकृती अस्वास्थामुळे करण्यात आलेलं रुग्णालयात दाखल (Dharmendra Passes Away)
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांना प्रकृती अचानक बिघडल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. सरुवातीला उपचारांना ते प्रतिसाद देत होते. पण, नंतर त्यांची प्रकृती काहीशी नाजूक होती. त्यामुळे त्यांना ICU मधून व्हेंटिलेटरवर शिफ्ट करण्यात आलेलं. धर्मेंद्र उपचारांना प्रतिसाद देत, असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिलेली. पण, आता देओल कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत.
धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान, शाहरुख खान, गोविंदा, आमिषा पटेल यांसारख्या स्टार्सनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतलेली.
1981 मध्ये विजयता फिल्म
1981 मध्ये, प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी चित्रपट उद्योगात आपले पाय अधिक मजबूत करण्यासाठी 'विजयता फिल्म्स' हे त्यांचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं. 'विजयता फिल्म्स'च्या माध्यमातून, धर्मेंद्र यांनी सर्वात आधी त्यांची दोन्ही मुलं, सनी देओल आणि बॉबी देओल यांना बॉलिवूडमध्ये आणलं. यानंतर धर्मेंद्र यांनी त्यांच्या कुटुंबातील पुढच्या पिढीला चित्रपटांमध्ये संधी दिली, त्यांचा नातू करण देओल याची प्रेक्षकांना ओळख करून दिली.
तब्बल सहा दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणारा 'ही-मॅन'
धर्मेंद्र यांनी आपल्या सहा दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत 'शोले', 'चुपके चुपके', 'सत्यकाम', 'सीता और गीता' यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम केलं. जरी त्यांनी जगाला अखेरचा अलविदा म्हटलं असलं, तरीसुद्धा ते आज, उद्या आणि कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतील.
6 दशकांच्या चित्रपट कारकिर्दीत 300 हून अधिक चित्रपट
धर्मेंद्र यांनी त्यांच्या 6 दशकांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2012 मध्ये त्याला पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये 'दिल भी तेरा हम भी तेरे' या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी 'फूल और पत्थर', 'सीता और गीता', 'शोले', 'धरमवीर', 'आंखे', 'राजा जानी',," 'गुलामी', 'प्रतिज्ञा', 'नये जमाना', ' बर्निंग ट्रेन' आणि 'यादों की बारात' यासह अनेक हिट चित्रपट दिले. या चित्रपटांनी त्यांना केवळ एक प्रमुख अभिनेता म्हणून स्थापित केलं नाही तर प्रेक्षकांवर कायमची छाप सोडली.