Dharmendra First Big Hit: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या निधनानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अगदी सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या धर्मेंद्रंनी बघता बघता सिनेसृष्टीवर राज्य केलं. पण, तुम्हाला माहितीय का? त्यांच्या आयुष्यातला सर्वात पहिला सुपरडुपर हिट सिनेमा कोणता? ज्या सिनेमानं धर्मेंद्र यांना सुपरस्टार बनवलं, तो सिनेमा म्हणजे, 'फूल और पत्थर' (Phool Aur Patthar). 1966 मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा तब्बल 50 आठवडे थिएटरमध्ये चालला आणि प्रेक्षकांकडून त्याला इतकं प्रेम मिळालं की, तो धर्मेंद्रंच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा हिट सिनेमा ठरला. 

Continues below advertisement

89 वर्षांचे धर्मेंद्र यांच्यावर बऱ्याच दिवसांपासून उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर त्यांच्या राहत्या घरीच उपचार सुरू होते. अखेर सोमवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि अख्ख्या सिनेसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांचे किस्से, त्यांचे सिनेमांच्या सध्या चर्चा रंगल्या आहेत. त्यापैकीच एक त्यांचा हिट सिनेमा 'फूल और पत्थर'.

'फूल और पत्थर' हा सिनेमा शाका नावाच्या एका गुंडाभोवती फिरतो, ज्याचं आयुष्य शांती देवी नावाच्या विधवेबद्दल सहानुभूती वाटल्यानं बदलतं. दिग्दर्शक ओ.पी. रल्हान यांनी सुरुवातीला या भूमिकेसाठी सुनील दत्त यांना विचारलं होतं, पण चित्रपटाच्या धाडसी थीममुळे त्यांनी नकार दिला. त्यानंतर धर्मेंद्र यांना ही भूमिका ऑफर करण्यात आली आणि मीना कुमारीनं शांतीची भूमिका साकारली.

Continues below advertisement

हिट ठरलेली धर्मेंद्र आणि मीना यांची जोडी 

'फूल और पत्थर' हा सिनेमा 14 ऑगस्ट 1966 रोजी स्वातंत्र्यदिनाच्या विकेंडला प्रदर्शित झालेला आणि पहिल्या आठवड्यातच तो हिट ठरला. धर्मेंद्र आणि मीना कुमारी यांच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. यामुळेच दोघांनी 'चंदन का पलाना', 'मंझली दीदी आणि 'बहारों की मंझिल' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. फूल और पत्थर इतका मोठा हिट झाला की, त्याचा तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत रिमेक करण्यात आला. तमिळ रिमेकमध्ये एमजी रामचंद्रन, तेलुगू आवृत्तीत एन. टी. रामा राव आणि मल्याळम आवृत्तीत जयन यांनी मुख्य भूमिका साकारलेल्या.

फिल्म्सना मिळालेले कित्येक अवॉर्ड्स 

या सिनेमाला दोन फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले. वसंत बोरकर यांना सर्वोत्कृष्ट एडिटिंगसाठी आणि शांती दास यांना सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी सन्मानित करण्यात आलेलं. धर्मेंद्र आणि मीना कुमारी व्यतिरिक्त, या चित्रपटात शशिकला, जीवन, ललिता पवार, मदन पुरी, टुनटुन, लीला चिटणीस, सुंदर आणि इफ्तेखार सारखे कलाकार होते, ज्यांच्या उपस्थितीनं कथेला आणखी बळकटी दिली.

'फूल और पत्थर' हा अजूनही धर्मेंद्रंच्या सर्वात खास चित्रपटांपैकी एक मानला जातो, कारण या चित्रपटानंच त्यांना पहिल्यांदा चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांमध्ये स्थान दिलंय.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Hema Malini Viral Video After Dharmendra Cremation: धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप दिला, अंत्यसंस्कारानंतर हेमा मालिनींचा पहिला VIDEO समोर