Dharmendra Social Media Post : दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचा चाहतावर्ग फार मोठा आहे. पण सध्या या चाहत्यावर्गामध्ये बरचं चिंतेंचं वातावरण असल्याचं  म्हटलं जात आहे. कारण धर्मेंद्र यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून येत असलेल्या पोस्ट. मागील काही दिवसांपासून धर्मेंद्र यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टमुळे चाहतावर्ग बराच चिंतेत सापडलाय. तसेच धर्मेंद्र यांना नेमकं झालंय तरी काय असा देखील प्रश्न त्यांना पडलाय. 


त्यातच आजच म्हणजे 3 मार्च रोजी धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर भल्या पहाटे एक पोस्ट केली. त्या पोस्टमुळे पुन्हा एकदा धर्मेंद्र यांच्या चाहत्यांना प्रश्न पडला. धर्मेंद्र यांनी त्यांचा एक जुना फोटो शेअर करत त्याला अच्छा तो हम चलते हैं, असं कॅप्शन दिलंय. त्यांची ही पोस्ट पाहून त्यांच्या चाहत्यांच बराच मोठा प्रश्न पडलाय. तसेच अनेकांनी त्यांच्या या फोटवर कमेंट्स करत त्यांच्या तब्येतीची देखील विचारपूस केलीये. 






धर्मेंद्र यांच्या संभ्रमात टाकणाऱ्या पोस्ट


मागील काही दिवसांपासून धर्मेंद्र यांच्या पोस्टमुळे बराच संभ्रम देखील निर्माण केलाय. याआधी त्यांनी गालियाँ होवन सुन्नियों। ,,,,,, जत्थे मिर्ज़ा यार फिरे ,,,,,, असं कॅप्शन देत पोस्ट शेअर केली होती. याआधी धर्मेंद्र यांनी त्यांच्या एका जुन्या चित्रपटाचे पोस्टस शेअर केले होते. त्याला त्यांनी  'गुनाह बख्श दे अब और सजा ना दे. हम टूट चले, अब और इम्तिहान ना ले. तेरे रहम ओ करम पे हैं. तेरे रहम ओ करम बना रहे!' असं कॅप्शन दिलं होतं. 







धर्मेंद्र यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर अलीकडेच धर्मेंद्र रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात पाहायला मिळाले होते.  या चित्रपटात शबाना आझमी, जया बच्चन, रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्यासोबत त्यांनी स्क्रिन शेअर केली होती. तसेच धर्मेंद्र हे नुकतेच तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटातून देखील प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. 


ही बातमी वाचा : 


Vaidehi Parashurami : जेव्हा कामाचं कौतुक करण्यासाठी तब्बू फोन करते..., अभिनेत्री वैदेही परशुरामीने सांगितली आयुष्यातली गोड आठवण