Dharmendra Death: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या निधनानं त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसलाय. संपूर्ण देओल कुटुंब शोकसागरात बुडालं आहे. सोमवारी 24 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र (Actor Dharmendra) यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानं संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक दिग्गज उपस्थित होते. अशातच यावेळी धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनीही (Hema Malini) दिसल्या. धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार करुन त्या परतत होत्या, त्यावेळी त्यांनी माध्यमांना पाहून हात जोडले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धर्मेंद्र नेहमीच त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिले. पण, आता सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. धर्मेंद्र मागे ठेवून गेलेल्या प्रॉपर्टीची. अगदी सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या धर्मेंद्र यांनी कोट्यवधींचं साम्राज्य उभं केलंय. लोणावळ्यातील 100 एकरच्या फार्महाऊसपासून ते अगदी जुहूतल्या 125 कोटींच्या बंगल्यापर्यंत, धर्मेंद्र यांच्या मालकीच्या अनेक प्रॉपर्टी आहेत. पण, आता त्यांच्या पश्चात हे सर्व कुणाला मिळणार? यामध्ये हेमा मालिनी यांचा हक्क आहे?
धर्मेंद्र यांनी केलेली दोन लग्न (Dharmendra Two Marriages)
बॉलिवूड सुपरस्टार धर्मेंद्र यांनी दोन लग्न केलेली. पहिलं लग्न त्यांनी इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यापूर्वीच प्रकाश कौर यांच्यासोबत केलेलं. तर, दुसरं लग्न त्यांनी हिंदी सिनेसृष्टीची ड्रिमगर्ल हेमा मालिनी यांच्यासोबत केलेलं. अशातच आता सर्वात चर्चेत असलेला प्रश्न म्हणजे, धर्मेंद्र यांच्या मालमत्तेत आणि पेन्शनमध्ये हेमा मालिनींना वाटा मिळणार का?
खरं तर, कायद्यातील तरतूदींनुसार, धर्मेंद्र यांच्या प्रॉपर्टीत किंवा पेन्शनमध्ये हेमा मालिनी यांना कोणताही हिस्सा मिळणार नाही. याचं कारण म्हणजे, धर्मेंद्र यांनी पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्याशी घटस्फोट न घेताच हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलेलं. अशातच, हिंदू मॅरेज अॅक्टनुसार, पहिली पत्नी असूनही हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचं लग्न वैध ठरत नाही. त्यामुळे हेमा मालिनी यांना धर्मेंद्र यांच्या प्रॉपर्टीमध्ये कोणताही वाटा मिळणार नाही. याव्यतिरिक्त धर्मेंद्र यांच्या पेन्शनमध्येही हेमा मालिनी यांना कोणताही अधिकार मिळणार नाही.
धर्मेंद्र यांच्या प्रॉपर्टीवर कुणाचा अधिकार? (Who Has Right To Dharmendra Property?)
धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर आणि त्यांच्या सहा मुलांचा त्यांच्या मालमत्तेत वाटा आहे. या सहा मुलांपैकी चार मुलं सनी देओल, बॉबी देओल, अजिता देओल आणि विजेता देओल आहेत, तर हेमा मालिनी यांच्यापासून दोन मुली ईशा देओल आणि अहाना देओल आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, धर्मेंद्र यांच्या पश्च्यात 450 कोटींची मालमत्ता आहे.
धर्मेंद्र यांची दोन लग्न कधी झालेली?
धर्मेंद्र यांनी 1954 मध्ये प्रकाश कौर यांच्याशी पहिलं लग्न केलेलं. त्यावेळी धर्मेंद्र 19 वर्षांचे होते. त्याकाळी धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांचं अरेंज मॅरेज होतं. धर्मेंद्र यांनी 2 मे 1980 रोजी हेमा मालिनी यांच्याशी लग्न केलं. पण, त्यावेळी प्रकाश कौर यांनी धर्मेंद्र यांना घटस्फोट देण्यास नकार दिला. पण, त्यानंतर धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारल्याचंही सांगितलं जातं. दरम्यान, हेमा मालिनींशी लग्न झाल्यानंतरही धर्मेंद्र प्रकाश कौर यांच्यासोबतच राहायचे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :