Dharmendra Death: बॉलिवूडचे (Bollywood News) 'ही-मॅन' धर्मेंद्र (Dharmendra) यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. धरम पाजी यांचं 24 नोव्हेंबर रोजी निधन झालं. धर्मेंद्र गेले, पण त्यांचे चित्रपट, कथा, कहाण्या आणि सोशल मीडियावरील व्हिडीओ नेहमीच आपल्यासोबत राहतील, त्यांची आठवण करून देतील. त्यांना मोठ्या पडद्यावर पाहणं हा खरोखरच एक अनोखा अनुभव होता.
दरम्यान, धरम पाजींच्या निधनानंतर, त्यांचा शेवटचा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ज्यामुळे आपल्याला आपल्या आवडत्या अभिनेत्याला मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. या सिनेमाचं नाव 'इक्कीस'. धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा 25 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात तुम्हाला धर्मेंद्र नक्कीच दिसतील. पण, असा एक सिनेमा आहे, जो आता बनणं अशक्यच आहे.
धर्मेंद्र यांची 'ती' इच्छा अधुरीच...
धरम पाजींच्या निधनानंतर अशी कोणती फिल्म आहे, जी मोठ्या पडद्यावर येणारच नाही, असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. हा सिनेमा त्यांच्या कुटुंबाचा स्वप्नातील प्रकल्प आहे, ज्याची चर्चा अनेक वेळा झाली, पण काम अद्याप सुरू झालेलं नाही. या चित्रपटाचं नाव आहे, 'अपने 2'.
स्वतः धर्मेंद्र 'अपने 2'बद्दल अनेकदा बोलले आहेत. पण, त्यावर कोणतंही काम सुरू झालेलं नाही. 'अपने' सिनेमा 2007 मध्ये प्रदर्शित झालेला. या सिनेमात धर्मेंद्र, बॉबी देओल आणि सनी देओल ही बाप-लेकांची जोडी मोठ्या पडद्यावर झळकलेली. हा सिनेमा खूप गाजलाही. त्यामुळे या सिनेमाच्या सिक्वेलबद्दल चर्चा सुरू झालेली आणि धर्मेंद्र यांनी याबाबत इच्छाही व्यक्त केलेली. दरम्यान, याबद्दल अधिकृतपणे काहीही जाहीर करण्यात आलं नव्हतं.
धर्मेंद्र यांच्या कुटुंबात कोण आहे?
धर्मेंद्र यांच्या कुटुंबात आता त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर आणि मुली अजिता आणि विजेता, मुलं सनी आणि बॉबी, त्यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी यांच्या मुली, मुली ईशा आणि अहाना यांचा समावेश आहे. धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबमध्ये झाला. त्यांच्या 65 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत धर्मेंद्र यांनी 300 हून अधिक सिनेमांमध्ये काम केलंय. यामध्ये 'शोले', 'सत्यकाम', 'चुपके चुपके', 'माँ', 'आंखे आणि जुगून' सारखे चित्रपट आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :