Dharmendra Latest News: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल (Dharmendra) यांची प्रकृतीत सध्या सुधारणा होत असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काल (10 नोव्हेंबर) धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली होती. यानंतर आज (11 नोव्हेंबर) धर्मेंद्र यांचं निधन झाल्याच्या अफवा (Rumors of Dharmendra death) समोर आल्या. परंतु धर्मेंद्र यांचं निधन झालेलं नाही. त्यांच्या प्रकृती स्थिर असून कालपेक्षा आज प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच धर्मेंद्र यांच्याबाबत सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये खोट्या अफवा पसरल्याचं धर्मेंद्र यांची मुलगी अभिनेत्री इशा देओल आणि धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी पोस्ट करत धर्मेंद्र यांचं निधन झालं नसल्याचं सांगितलं आहे.
इशा देओल पोस्ट करत काय म्हणाली? (Esha Deol Post On Dharmendra)
अभिनेता धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, असं धर्मेंद्र यांची कन्या आणि अभिनेत्री इशा देओलने स्पष्टीकरण दिलं आहे.
हेमा मालिनी काय म्हणाल्या? (Hema Malini Post On Dharmendra)
जे घडत आहे ते अक्षम्य आहे...जबाबदार चॅनेल्स उपचारांना प्रतिसाद देत असलेल्या आणि हळूहळू बरे होणाऱ्या व्यक्तीबद्दल खोट्या बातम्या कशा पसरवू शकतात? हे अत्यंत अनादरपूर्ण आणि बेजबाबदार वर्तन आहे. कृपया कुटुंबाचा आणि त्यांच्या गोपनीयतेच्या गरजेचा आदर करा, असं हेमा मालिनी म्हणाल्या.
धर्मेंद्र यांची संपूर्ण वैयक्तिक माहिती- (Dharmendra Personal Information)
पूर्ण नाव: धरम सिंह देओल
जन्म: 8 डिसेंबर 1935 (वय 88)
जन्मस्थान: साहनेवाल, पंजाब, ब्रिटिश भारत
शिक्षण: त्यांचे वडील किशन सिंह देओल हे गावातील शाळेचे मुख्याध्यापक होते.
कुटुंब:
पहिली पत्नी: प्रकाश कौर (1954 मध्ये लग्न झाले).
मुले (प्रकाश कौर यांच्याकडून): सनी देओल आणि बॉबी देओल (दोघेही अभिनेते), आणि दोन मुली - विजयता आणि अजिता.
दुसरी पत्नी: हेमा मालिनी (1980 मध्ये लग्न झाले).
मुली (हेमा मालिनी यांच्याकडून): ईशा देओल (अभिनेत्री) आणि आहाना देओल (प्रशिक्षित नृत्यांगना).
कारकीर्द
पदार्पण: त्यांनी 1960 मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटाने अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
चित्रपट: त्यांनी सहा दशकांहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
लोकप्रियता: ते त्यांच्या अॅक्शन चित्रपटांमधील तडफदार भूमिकांसाठी विशेष ओळखले जातात. शोले, फूल और पत्थर, सत्यकाम, मेरा गाव मेरा देश, चुपके चुपके, धर्म वीर, आणि अलीकडील रॉकी और रानी की प्रेम कहानी यांसारखे त्यांचे अनेक चित्रपट खूप गाजले.
निर्मिती: त्यांनी 'विजयता फिल्म्स' नावाची स्वतःची निर्मिती कंपनी सुरू केली, ज्याद्वारे त्यांनी सनी देओलला बेताब (1983) आणि बॉबी देओलला बरसात (1995) द्वारे लाँच केले.
राजकारण: ते 2004 ते 2009 या काळात राजस्थानमधील बिकानेर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार होते.
पुरस्कार आणि सन्मान
फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार: हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1997 मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पद्म भूषण: 2012 मध्ये भारत सरकारने त्यांना भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान 'पद्म भूषण' देऊन गौरवले.
धर्मेंद्र आजही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत आणि त्यांच्या अभिनयाची छाप सोडत आहेत.
अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर, VIDEO:
संबंधित बातमी:
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाबाबत उलटसुलट चर्चांना उधाण, गोंधळामुळे संभ्रम वाढला