Bobby Deol Break Down After Meet Dharmendra: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचे (Bollywood News) दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वाढत्या वयाच्या व्याधींनी त्रस्त असलेले अभिनेते धर्मेंद्र यांना यापूर्वीही अनेकदा मुंबईच्या (Mumbai News) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) आलं आहे. पण, यावेळी मात्र त्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, सोमवारी संध्याकाळपासूनच ब्रीच कँडी रुग्णालयात सिनेस्टार्सची ये-जा पाहायला मिळतेय. 

Continues below advertisement

सलमान खान (Salman Khan), शाहरुख खान (Shah Rukh Khan), गोविंदा (Govinda) हे धर्मेंद्र यांना भेटायला आल्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. धर्मेंद्र यांची भेट घेतल्यानंतर सर्व स्टार्सचे चेहरे पडलेले दिसले. अशातच धर्मेंद्र यांचा थोरला मुलगा सनी देओल आणि धाकटा मुलगा बॉबी देओलही (Bobby Deol) रुग्णालयाबाहेर स्पॉट झाले. त्यावेळचा बॉबी देओलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

'शोले'मधील सुपरस्टार धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर असल्याच्या वृत्ताचं सनी देओलच्या टीमनं खंडन केलं. सनी देओलच्या टीमनं म्हटलंय की, "धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. सर्वांना विनंती आहे की, त्यांनी त्यांना लवकर बरं वाटावं, यासाठी प्रार्थना करावी आणि कुटुंबाच्या गोपनीयतेच्या अधिकाराचा आदर करावा..."

Continues below advertisement

वडिलांना भेटून निघाल्यानंतर बॉबी देओल भावूक 

दरम्यान, काल रात्री धर्मेंद्र यांचं संपूर्ण कुटुंब, ज्यात मुलगा सनी देओल, पत्नी हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओल रुग्णालयात त्यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. आपल्या वडिलांची भेट घेऊन निघाल्यानंतर बॉबी देओल पॅपाराझींच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. त्यावेळी तो चेहरा लपवताना दिसला. दरम्यान, रुग्णालयाबाहेरील पॅपाराझी कॅमेऱ्यांनी बॉबी देओलचा चेहरा टिपला. यावेळी बॉबी देओल खूपच भावूक दिसत होता. त्यानं हातात टिशू पेपर धरलेला. तर, त्याचे डोळे अश्रूंनी डबडबलेले दिसत होते. कॅमेरे त्याच्यावर खिळल्याचं कळताच, त्यानं आपल्या हातानं आपला चेहरा झाकून घेतला. दरम्यान, बॉबी देओल भावूक झाल्याचं पाहून चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे. 

'जिस मर्द के आंसू जल्दी आ जाएं वो कमजोर नहीं होता..."

लोकांनी बॉबीच्या व्हिडीओवर चिंता व्यक्त करत विचारलंय की, "बॉबी रडतोय का? देओल कुटुंबातील प्रत्येकजण खूप भावूक आहे..." काहींनी पॅपाराझींवर राग व्यक्त केला आहे आणि म्हटलंय की, "कृपया या लोकांना एकटं सोडा..." एकानं म्हटलंय की, "जिस मर्द के आंसू जल्दी आ जाएं वो कमजोर नहीं होता..." लोकांनी म्हटलंय की, "तो आपला चेहरा लपवतोय. ते कोणाचेही पालक असले तरी, अशा वेळी प्रत्येकजण रडतो..." दुसऱ्या एका युजरनं म्हटलंय की, "तो त्याच्या आजारी वडिलांसाठी रडतोय, त्याचं रडणं पाहवत नाहीय."

6 दशकांच्या चित्रपट कारकिर्दीत 300 हून अधिक चित्रपट

धर्मेंद्र यांनी त्यांच्या 6 दशकांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2012 मध्ये त्याला पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये 'दिल भी तेरा हम भी तेरे' या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी 'फूल और पत्थर', 'सीता और गीता', 'शोले', 'धरमवीर', 'आंखे', 'राजा जानी',," 'गुलामी', 'प्रतिज्ञा', 'नये जमाना', ' बर्निंग ट्रेन' आणि 'यादों की बारात' यासह अनेक हिट चित्रपट दिले. या चित्रपटांनी त्यांना केवळ एक प्रमुख अभिनेता म्हणून स्थापित केलं नाही तर प्रेक्षकांवर कायमची छाप सोडली. 

धर्मेंद्र मॅडॉक फिल्म्सच्या 'इक्कीस' या चित्रपटात झळकणार 

1990 नंतर, 'प्यार किया तो डरना क्या', 'अपने', 'यमला पगला दीवाना' आणि 2024 चा चित्रपट 'तेरी बाते में ऐसा उल्झा जिया' सारख्या चित्रपटांसह त्यांनी मुख्य भूमिकांऐवजी सहाय्यक भूमिका केल्या. आता ते मॅडॉक फिल्म्सच्या 'इक्कीस'(21kk) चित्रपटात पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Jaya Bachchan On Dharmendra: 'माझं धर्मेंद्रवर प्रेम आहे...', जेव्हा हेमा मालिनी यांच्यासमोरच जया बच्चन यांनी दिलेली प्रेमाची कबुली; काय घडलेलं?