Dhanashree Verma And Yuzvendra Chahal : भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा हे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. नुक्त्यात झालेल्या भारत-न्युझीलंड यांच्या सामन्यात युझवेंद्र चहलसोबत आरजे माहवश (RJ Mahvash) दिसल्यामुळे आता युझवेंद्र-धनश्री ही जोडी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. या दोघांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे म्हटले जात असून त्यांच्या घटस्फोटाच्याही अफवा पसरल्या आहेत. दरम्यान, युझवेंद्र चहल आणि आरजे माहवश एकत्र दिसल्यानंतर आता धनश्री वर्माने मोठा निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयानंतर आता नवे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
धनश्री वर्माने नेमकं काय केलंय?
धनश्री वर्मा आणि युझवेंद्र चहल लवकरच घटस्फोट घेणार असल्याचा दावा केला जातोय. त्यांच्या नात्यात सर्वकाही आलबेल नसल्यांचही म्हटलं जातंय. गेल्या बऱ्याच महिन्यांपासून हे दोघे एकत्र दिसलेले नाहीत. दोघांच्या नात्यात वितुष्ट निर्माण झाल्यानंतर धनश्री वर्माने युझवेंद्रसोबतचे सर्व फोटो इन्स्टाग्रामवरून हटवले होते. त्यानंतर आता युझवेंद्र चहल आणि आरजे माहवश हे लाईव्ह सामन्यात एकत्र बसलेले कॅमेऱ्यात कैद झाले. त्यानंतर आता धनश्रीने इन्स्टाग्रामवरील युझवेंद्रसोबतचे सर्व फोटो अनआर्काईव्ह केले आहेत. त्यामुळे आता धनश्रीच्या इन्स्टाग्राम खात्यावर युझवेंद्र चहलसोबतचे सर्व फोटो दिसत आहेत. काही फोटोंमध्ये हे दोघे एकमेकांसोबत उभे राहिल्याचे दिसत आहे. तर काही फोटोंच्या कॅप्शनमध्ये धनश्रीने युझवेंद्र चहलचे तोंडभरून कौतुक केलेले दिसत आहे. आता धनश्रीने दोघांचे सर्व फोटो अनआर्काईव्ह केल्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. तिने असा निर्णय का घेतला? असे विचारले जात आहे.
युझवेंद्र-आरजे माहवश दिसले एकत्र
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भारत विरुद्ध न्युझीलंड या अंतिम सामन्यात युझवेंद्र आणि आरजे माहवश एकत्र दिसले. युझवेंद्र यावेळी भारतीय संघाचा भाग नव्हता मात्र तो स्टेडियममध्ये बसून या सामन्याचा आनंद घेत होता. याच सामन्यात त्याच्या बाजूला आरजे माहवश बसलेली होती. विशेष म्हणजे हे दोघेही एकत्र बसून थट्टा-मस्करी करताना दिसत होते. त्याचे हसणे कॅमेऱ्यात कैद झाले होते. हे दोघेही एकत्र दिसल्यानंतर त्यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. आरजे माहवश ही एक रेडिओ जॉकी आहे. ती अभिनेत्री, निर्मातीही आहे. तिचे इन्स्टाग्रावर लाखो चाहते आहेत.
धनश्रीच्या इन्स्टा स्टोरीची चर्चा
युझवेंद्र चहल आणि आरजे माहवश हे एकत्र दिसल्यानंतर धनश्री वर्मा चर्चेत आली. या दोघांचे फोटो समोर आल्यानंत अवघ्या काही तासांनंतर धनश्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी ठेवली. या सूचक स्टोरीचे अनेक अर्थ काढले जात आहेत. 'स्त्रियांना दोषी ठरवणे ही एक फॅशन राहिलेली आहे' असं तिने या स्टोरीमध्ये म्हटलं होतं.
दरम्यान, आता धनश्रीने युझवेंद्रसोबतचे फोटो अनआर्काईव्ह केल्यामुळे आता नव्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा :