Dhurandhar Box Office Collection Day 3: 2025 च्या बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक म्हणजे, रणवीर सिंहचा (Ranveer Singh) नुकताच रिलीज झालेला 'धुरंधर' (Dhurandhar Movie).  'धुरंधर' हा स्पाय थ्रिलर चित्रपट (Spy Thriller Movie) बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धमाकेदार कामगिरी करतोय. रिलीजच्या पहिल्या दिवशी सिनेमानं अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली. त्यानंतर बंपर कलेक्शनही केलं. 'धुरंधर' रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) आजवरच्या सर्व सिनेमांपैकी  सर्वात मोठा ओपनर सिनेमाच नाहीतर, 'सैय्यारा'ला मागे टाकणारा वर्षातला तिसरा सर्वात मोठा ओपनर ठरलाय. रिलीजच्या दुसऱ्या दिवशीही सिनेमानं आपली जोरदार कमाई सुरुच ठेवलेली. तर तिसऱ्या दिवशी सिनेमानं बॉक्स ऑफिसवर अक्षरशः आग लावली. 

Continues below advertisement

'धुरंधर'नं तिसऱ्या दिवशी किती कमाई केली? 

दिग्दर्शक आदित्य धर यांनी विक्की कौशलच्या 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक'चं दिग्दर्शन केलंय. त्या ब्लॉकबस्टर सिनेमानंतर सहा वर्षांनी, आदित्य धर 'धुरंधर'द्वारे दिग्दर्शनात परतलाय. त्यामुळे त्याच्या 'धुरंधर'कडून सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. अखेर 'धुरंधर'नं त्या पूर्ण केल्याचं सिनेमाला मिळणाऱ्या प्रतिसादावरुन दिसतंय. दिग्दर्शक आदित्य धरचा 'धुरंधर' भारताच्या गुप्तचर संस्था, रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) चा समावेश असलेल्या एका गुप्त ऑपरेशनवर आधारित आहे.

रणवीर सिंह व्यतिरिक्त, या चित्रपटात अक्षय खन्ना, आर. माधवन, राकेश बेदी, सारा अर्जुन, संजय दत्त आणि अर्जुन रामपाल यांच्यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहे. दमदार कास्टिंग, हाई स्टेक जासूसी प्लॉट आणि पॉप्युलर म्युझिक यामुळे 'धुरंधर' हा चित्रपट आतापर्यंतच्या वर्षातील सर्वात अपेक्षित रिलीजपैकी एक बनला आहे. मनोरंजक म्हणजे, दमदार सुरुवातीनंतर, 'धुरंधर'नं त्याच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटीही धमाल केली आहे. चित्रपटाच्या प्रभावी कामगिरीनं ट्रेड एनालिस्ट देखील आश्चर्यचकित झाले आहेत. 

या सगळ्यात, 'धुरंधर'च्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, 'धुरंधर'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी 28 कोटी कमावले. दुसऱ्या दिवशी, चित्रपटाने 14.29 टक्के वाढ नोंदवली आणि 32 कोटी कमावले. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'धुरंधर'नं रिलीजच्या तिसऱ्या दिवशी, रविवारी 39.50 कोटी कमावले. यासह, 'धुरंधर'ची तीन दिवसांची एकूण कमाई आता 99.50 कोटींवर पोहोचली आहे.

'धुरंधर'चा ओपनिंग वीकेंडला धमाकेदार रेकॉर्ड 

'धुरंधर'नं त्याच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी अपवादात्मकपणे चांगली कामगिरी केली आहे. रणवीर सिंहचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा ओलांडल्यापासून काही पावलं दूर आहे. 99.50 कोटी कलेक्शनसह, तो त्याच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी आतापर्यंतचा चौथा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा बनला आहे. या सिनेमानं हाऊसफुल्ल 5 (91.83 कोटी), सिकंदर (86.44 कोटी), सैयारा (84.5 कोटी), कांतारा चॅप्टर 1 (75 कोटी), रेड 2 (73.83 कोटी), स्काय फोर्स (73.2 कोटी) आणि सितारे जमीन पर (57.3 कोटी) या चित्रपटांच्या ओपनिंग वीकेंड कलेक्शनला मागे टाकलं आहे.

'धुरंधर'चा धुवांधार रेकॉर्ड 

'धुरंधर' 39.50 कोटींचं कलेक्शन करुन पहिल्या रविवारी सर्वाधिक कमाई करणारी 16वी फिल्म बनली आहे. 'धुरंधर'नं 'रेस 3', 'बजरंगी भाईजान', 'पीके'सह जवळपा सर्वच फिल्म्सना मागे टाकलं आहे. आता खरी टेस्ट वीकडेजमध्ये होणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Dhurandhar Review: धुवांधार 'धुरंधर'; डायलॉग्स वाह रे वाह अन् स्टोरी लाईनची तर बातच और... शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा सिनेमा!