Dhamal 4 box office: सध्या सिनेमागृहांमध्ये 4 चित्रपटांचा बोलबाला पाहायला (Entertainment) मिळत आहे. 'धमाल 4' (Dhamal 4), 'इव्हिल डेड बर्न', 'अल्फा' आणि 'वेलकम टू द जंगल' (Welcome to the jungle) या चारही सिनेमांनी तुफान कमाई केली आहे.  चारही चित्रपटांमध्ये सध्या बॉक्स ऑफिसवर  स्पर्धा सुरू आहे. कोणता चित्रपट बाजी मारणार, यात लढत सुरू आहे. दरम्यान, रविवारी कोणत्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी केली? पाहूयात.

Continues below advertisement

'धमाल 4'नं रविवारी किती कोटी कमावले? (Dhamaal 4 Box Office collection)

अजय देवगणच्या 'धमाल 4' या कॉमेडी सिनेमानं अवघ्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे.  रविवारी या सिनेमाच्या कमाईने वेग घेतला. सॅकनिल्कच्या ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, या सिनेमाने भारतात 28.50 कोटी रुपयांची कमाई केली. आदल्या दिवशी या सिनेमाने 22 कोटी कमावले. या सिनेमाचे एकूण नेट कलेक्शन 65 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

'इव्हिल डेड बर्न' या सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

 

Continues below advertisement

'धमाल 4' सह हॉलिवूडचा 'इव्हिल डेड बर्न'  हा सिनेमा रिलीज झाला होता. भारतात या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती पाहायला मिळत आहे. विकेंडमध्ये या सिनेमाने जबरदस्त कमाई केली. रविवारी या सिनेमाने 4.90  कोटी कमावले.  भारतात या सिनेमाने आतापर्यंत एकूण 12 कोटींचं कलेक्शन केलं.

'अल्फा'ने किती कोटींचा बिझनेस केला?

आलिया भट्टचा 'अल्फा' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर ठीकठाक कमाई करत आहे. विकडेजच्या तुलनेत विकेंडमध्ये या सिनेमाने चांगली कमाई केली आहे. रविवारी या सिनेमाने 2.25 कोटी कमावले. तर,  शनिवारी 2 कोटींच्या आसपास कमावले.  या सिनेमाने  आतापर्यंत एकूण 53.620 कोटींचे कलेक्शन केले.

'वेलकम टू द जंगल'चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला

'वेलकम टू द जंगल'  या मल्टिस्टारर कॉमेडी सिनेमाने सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. मात्र, यानंतर या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळालं. या सिनेमाने रविवारी 1.90 कोटी कमावले. तर,एकूण 17 दिवसांत या सिनेमाने 129.55 कोटी कमावले.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'माझ्या पुढच्या कोणत्याच सिनेमात ती नसेल...'; 'देऊळ बंद 2'मध्ये गाजल्यानंतरही पत्नी स्नेहल तरडेला कास्ट करणार नाहीत, प्रवीण तरडेंनी कारण सांगितलं