Nagpur Tiger Attack News :नागपूर जिल्ह्यातील देवलापार (Deolapar) परिसरात परिसरात वाघाच्या भीतीने (Tiger Attack) झालेल्या धावपळीत बंधाऱ्यात पडून पिता-पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेत जीवन धर्मदास कोकोडे आणि त्यांचा मुलगा जतिन जीवन कोकोडे (वय 7) यांचा मृत्यू झालाय. या घटनेनंसर्वत्रशोककळापसरलीअसून हळहळ व्यक्तकेलीजातआहे. (Nagpur Tiger Attack News)
मिळालेल्यामाहितीनुसार, जीवन कोकोडे हे मुलगा जतिन व मेहुणा संजय उईके यांच्यासह छवारी शिवारातील लखन बंधाऱ्याजवळील शेतात कामासाठी गेले होते. तिघेही शेतात काम करत असताना संजय उईके याला सुमारे 80 ते 100 मीटर अंतरावर पट्टेदार वाघ दिसला. त्याने आरडाओरड करताच तिघांनीही जीव वाचविण्यासाठी धाव घेतली. यावेळी संजय उईके हा बंधाऱ्याच्या खालच्या बाजूने पळाला, तर जीवन कोकोडे व त्यांचा मुलगा जतिन बंधाऱ्याच्या वरच्या दिशेने धावू लागले. धावत असताना जतिनचा पाय घसरून तो बंधाऱ्यात पडला. मुलाला वाचविण्यासाठी जीवन कोकोडे यांनी तत्काळ पाण्यात उडी घेतली. त्यांना पोहता येत असले तरी मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात व पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात बुडाले. या दुर्दैवी घटनेत पिता-पुत्राचा मृत्यू झालाय.
Nagpur Tiger Attack News : वनविभागाने मृत पिता-पुत्राच्या वारसांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची नुकसानभरपाई
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच देवलापार पोलीस ठाण्याचे ठाणेदार नारायण तुरकुंडे तसेच वनपरीक्षेत्र अधिकारी शेषराव टुले हे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचाव व पंचनामा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या घटनेत वाघाच्या भीतीमुळे मृत्यू झाल्याचे लक्षात घेऊन वनविभागाने मृत पिता-पुत्राच्या वारसांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली असून तातडीची मदत म्हणून 50 हजार रुपये देण्यात आले. मात्रया घटनेनंतरगावातभीतीचंवातावरणनिर्माणझालंआहे.
Bhandara Leopard : भंडाऱ्यात बिबट्याचा चार महिन्याचा बछडा मृतावस्थेत आढळला
बिबट्याचा चार महिन्यांचा बछडा मृतावस्थेत आढळून आल्यानं भंडाऱ्यात मोठी खळबळ उडाली आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील जेवणाळा शेतशिवारात हा बछडा मृतावस्थेत आढळून आला. जेवणाचे शेतकरी निलेश गोंधळे हे शेतात गेले असता, त्यांना शेतातील बांधावर बिबट्याचा बछडा निपचित पडल्याचं दिसून आला. घाबरलेल्या शेतकऱ्यानं दुरूनचं त्याच्या हालचाली बघितल्या असता तो मृत असल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी घटनेची माहिती वनाधिकाऱ्यांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून भंडाऱ्याचे सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख, अड्याळचे वनपरिक्षेत्राधिकारी योगेश शर्मा यांच्यासह वन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शवविच्छेदन केल्यानंतर प्राप्त होणाऱ्या अहवालात बिबट्याच्या बछड्याच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल, असं वनाधिकाऱ्यांनी सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या
