Devoleena Bhattacharjee On Reservation Comment: टेलिव्हिजनची स्टार अभिनेत्री (Television Actress) देवोलीना भट्टाचार्जी (Actress Devoleena Bhattacharjee) 'गोपी बहू' देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) पुन्हा एकदा तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहेस. यावेळी तिनं केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे. देवोलीनानं एक सोशल मीडिया पोस्ट केली आणि त्यावरुन लगेचच चर्चांना उधाण आलं. प्रकरण मंत्रोच्चारण, आरक्षण, जात आणि नोकरीपर्यंत पोहोचलं आणि मग युजर्सनी अभिनेत्रीला घेरलं आणि थेट सुनावलं.

Continues below advertisement

एका व्हिडीओमुळे सुरू झाला वाद... (Devoleena Bhattacharjee Comment On Video)

एका युजरनं ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. एका व्हिडीओमध्ये काही ब्राह्मण मुलं वेदांचा अभ्यास करताना आणि मंत्रोच्चार करताना दिसत होती. हा व्हिडीओ शेअर करताना एका युजरनं प्रश्न उपस्थित केलाय की, अशा धार्मिक शिक्षणाचा देशाच्या विकासात काय वाटा आहे? त्या युजरनं पुढे लिहिलंय की, याचा फायदा केवळ एका विशिष्ट जातीलाच होईल, कारण ही मुलं मोठी होऊन मंदिरांचे पुजारी किंवा विश्वस्त बनू शकतात. त्यानंतर या पोस्टवरून वाद सुरू झाला. 

Continues below advertisement

या पोस्टवर कमेंट करताना दुसऱ्या एका युजरनं टिप्पणी केली की, नियमित शिक्षण घेण्याऐवजी ही मुलं मंत्रोच्चार करत आहेत आणि पुढे जाऊन जेव्हा त्यांना नोकऱ्या मिळणार नाहीत, तेव्हा ते आरक्षणाला दोष देतील... 'लज्जास्पद...', असंही त्या युजरनं म्हटलंय. यावर देवोलीनानं कमेंट करत म्हटलंय की, "तुम्ही स्वतः मंत्रोच्चार करून पहा, तुम्हाला आरक्षणाची गरज भासणार नाही. तुम्हाला ज्ञान मिळेल आणि त्यामुळे इतरांनाही काही त्रास होणार नाही..." देवोलीनाचा हा प्रतिसाद सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि लोकांची मतं दोन गटांत विभागली गेली.

पोस्टवरुन सुरू झाला वाद... (Devoleena Bhattacharjee Post)

अभिनेत्री देवोलीनाच्या पोस्टनंतर अनेक युजर्सनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. काहींनी असा युक्तिवाद केलाय की, प्रत्येकालाच मंदिरातील पुजारी बनण्याचा अधिकार नसतो, तर काहींनी तिच्या वक्तव्यामागच्या तर्कावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एका युजरनं लिहिलंय की, तिच्या बोलण्यात तितकाच तर्क आहे, जितका तिच्या टीव्ही मालिकांमध्ये असतो. आणखी एका युजरनं तिच्यावर राजकीय खुशामत केल्याचा आरोप केलाय. तिच्या पोस्टवर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असली, तरी काही युजर्सनी तिचं समर्थनही केलं आहे. दरम्यान, काहींनी त्यांच्या आंतरधर्मीय विवाहाचा संदर्भ देत उपरोधिक टीका केली, त्यांनी म्हटलंय की, याच कारणामुळे त्यांनी स्वतःचा धर्म सोडून दुसरीकडे जाऊन मंत्रपठण करण्याचा मार्ग निवडला असावा.

मनातील विचार मोकळेपणानं मांडण्याचा स्वभाव

देवोलीना भट्टाचार्जी सोशल मीडियावर सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर आपली मतं मोकळेपणानं मांडण्यासाठी ओळखली जाते. त्यांनी यापूर्वीही विविध विषयांवर आपली मतं व्यक्त केली आहेत. अलिकडेच, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा संदर्भ देत, त्यांनी पंजाब, केरळ आणि कर्नाटकच्या शिक्षण मंत्र्यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तिनं ट्विटरवर लिहिलंय की, इतर राज्यांतील शिक्षण मंत्र्यांनीही जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Nitesh Bhardwaj On Ramayana: 'आता ॲनिमलसारख्या फिल्म करू नकोस...'; टेलिव्हिजनच्या सुपरस्टार कृष्णानं टोचले रणबीर कपूरचे कान