Bhiwandi Building Collapses: भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील बालाजी नगर-गंगारामवाडी येथील कोहिनूर अपार्टमेंट ही तळ अधिक चार मजली अतिधोकादायक ठरवलेली इमारत (Bhiwandi Building Collapses:) गुरुवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. सदर घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळतात पालिका आपत्कालीन कक्ष अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी धावून आले. परंतु इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी अरुंद रस्ता असल्या कारणाने बचाव सुरू करण्यात अडथळे येत होते. त्यानंतर रात्री एक वाजता घटनास्थळी एनडीआरएफचे पथक व टीडीआरएफ दाखल झाले. इमारतीच्या सुरुवातीला असलेली एक जुनी चाळ जेसीबीच्या सहाय्याने तोडून काढल्यानंतर दुर्घटग्रस्त इमारतीपर्यंत यंत्रणा पोहोचली. त्यानंतर बचाव कार्य करण्यासाठी सुरुवात केली आहे.
कोहिनूर अपार्टमेंट ही 2007 मध्ये असिसमेंट असून 2012 मध्ये ही इमारत बनवण्यात आली असून या इमारतीमध्ये दोन अपार्टमेंट होते. परंतु कमकुवत काम असल्याने सुरवातीपासूनच इमारत धोकादायक झाल्याने पालिकेने ही इमारत धोकादायक घोषित केली होती. तर या इमारतीच्या एका विंगच्या तळमजल्यावर काही पिलर नादुरुस्त झाल्याने त्याची दुरुस्ती केली जात असल्याने सायंकाळी सहा वाजतापासूनच इमारतीला तडे जाण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे रात्री आठ वाजता इमारत झुकत असल्याने पालिका प्रभाग समिती क्रमांक चारचे सहाय्यक आयुक्त अरविंद घोगरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत इमारत खाली करण्यात येत होती. परंतु तळमजल्यावरील दुरुस्ती काम सुरू राहिल्याने व काही कुटुंबातील व्यक्ती साहित्य घेण्यासाठी इमारतीमध्ये असल्याने दुर्घटना घडल्यानंतर या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Bhiwandi Building Collapses)
आमदार महेश चौघुले काय म्हणाले? (MLA Mahesh Chougule On Bhiwandi Building Collapses)
सदर इमारत पालिकेने धोकादायक ठरविल्याने इमारतीला नोटीस लावण्यात आली होती. परंतु तळमजल्यावर सुरू असलेल्या दुरुस्ती कामामुळे ही दुर्घटना घडली असून यामध्ये पाच ते सहा जण अडकल्याची भीती असून घटनास्थळी एनडीआरएफ अग्निशामक दल, टीडीआरएफचे पथक मदतकार्य करीत असल्याची माहिती आमदार महेश चौघुले यांनी दिली आहे.
महापौर नारायण चौधरी काय म्हणाले? (Mayor Narayan Choudhari On Bhiwandi Building Collapses)
या दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना काढण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले जाईल.महानगरपालिकेची सर्व यंत्रणा कामाला लागलेली आहे.धोकादायक असल्याने इमारत खाली असल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी नागरिकांनी धोकादायक इमारती खाली करून आपला जीव वाचवणे गरजेचे आहे.पालिका धोकादायक इमारतींचे पाणी व वीज कनेक्शन तोडल्यानंतर ही काही जण इमारती मध्ये राहतात त्यांना आता पोलिस बंदोबस्त घेऊन बाहेर काढावे लागेल.तर दुर्घटनाग्रस्त इमारती मधील कुटुंबियांना नजिकच्या समाज गृह शाळांमधून तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली असल्याची माहिती महापौर नारायण चौधरी यांनी दिली आहे.
इमारतीमधील कुटुंब काय म्हणाले? (Bhiwandi Building Collapses)
या इमारतीच्या तळमजल्यावर वरच्या मजल्यावर अनेक जण अडकले होते. अरविंद गुप्ता हे कुटुंब देखील इमारत कोसळत असताना ढिगारा खाली पडत असताना अरविंद गुप्ता व पत्नी बाहेर पडले पण मुलगी कोमल या ढिगाऱ्या खाली अडकली होती. तिने आपली स्वतःची कशीबशी सुटका करून घेत आपला जीव वाचवला. इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना दुर्घटना घडल्याचे तिने सांगितले. या इमारतीच्या दुर्घटनाग्रस्त भागातील रहिवाशींना परिसरातील स्थानिक तरुणांनी तातडीचे मदत करत अनेक कुटुंबातील सदस्यांना बाहेर काढले. तर ढिगाराखाली अडकलेल्या दोघांना देखील बाहेर काढण्यात त्यांना यश आलं. मात्र अजूनही ढिगाराखाली पाच ते सहाजण असल्याचे माहिती समोर येत आहे . इमारतीमध्ये पिलरचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली.
