Nitesh Bhardwaj On Ramayana: नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांच्या 'रामायण' सिनेमाचा (Ramayana Movie Trailer) ट्रेलर प्रदर्शित झाला असून सध्या त्याची सगळीकडेच जोरदार चर्चा रंगली आहे. सिनेमाच्या धमाकेदार ट्रेलरनं (Bollywood Movie Trailer) सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. या सिनेमात स्टार कास्टची मांदियाळी आहे. यात अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. सिनेमाचा ट्रेलर पाहून प्रभावित झालेल्या प्रेक्षकांना आता सिनेमाची उत्सुकता लागली आहे. अशातच आता टेलिव्हिजनच्या श्रीकृष्णानं यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
टेलिव्हिजनवर श्रीकृष्णाची भूमिका साकारून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते नितीश भारद्वाज (Nitesh Bhardwaj) यांनी 'रामायण' (Ramayana) सिनेमाबाबत ऑस्करशी संबंधित एक अंदाज वर्तवला आहे. रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांची मुख्य भूमिका असलेल्या 'रामायण'ला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून, अनेक सेलिब्रिटींनीही सिनेमाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. आता, 'महाभारत' मालिकेतील भूमिकेसाठी ओळखले जाणारे अभिनेते नितीश भारद्वाज यांनीही सिनेमाचं कौतुक करत काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.
नितीश भारद्वाज यांनी इन्स्टाग्रामवर नितेश तिवारी यांच्या 'रामायण' सिनेमाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. सिनेमाच्या पोस्टरसोबतच त्यांनी एक सविस्तर पोस्ट लिहीत आपले विचार मांडले आहेत. त्यांनी असा अंदाज वर्तवलाय की, हा सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत सहभागी होऊ शकतो आणि त्याचबरोबर रणबीर, रणवीर यांना धुरंधर म्हटलं आहे.
100 टक्के ऑस्क मिळणारच... : नितेश भारद्वाज (Nitesh Bhardwaj On Ramayana Movie Get Oscar)
नितेश भारद्वाज यांनी पोस्टमध्ये लिहिलंय की, "बेस्ट फॉरेन फिल्मसाठी 100 टक्के ऑस्कर मिळणार. खूप-खूप अभिनंदन. सत्यजीत रे आणि शेखर कपूर यांच्यानंतर नितेश तिवारी जागतिक सिनेसृष्टीला भारतानं दिलेली पुढची देणगी आहे. प्रॉडक्शन डिझाइनपासून ते सिनेमॅटोग्राफीपर्यंतच्या विविध कॅटेगरीमध्ये हा सिनेमा अनेक पुरस्कार जिंकणार आहे. यात व्हीएफएक्स (VFX) आणि एआय (AI) च्या मदतीनं त्या काळातील वातावरण अतिशय भव्यपणे साकारण्यात आला आहे.
रणबीर कपूरची रणवीर सिंहसोबत तुलना (Ranbir Kpoor vs Ranveer Singh)
नितेश भारद्वाजनं पुढे बोलताना 'रामायण'च्या म्युझिकचं कौतुक करताना लिहिलंय की, "भारतीय सिनेमांसाठी काम केल्याबद्दल संगीतकार हॅन्स झिमर यांचं कौतुक. रणबीर आणि रणवीर आता एकत्र येऊन एक जबरदस्त जोडी बनलेत. जागतिक सिनेसृष्टीत यशचं स्वागत आहे. आरके (RK), एक अभिनेता म्हणून मी नेहमीच तुझी प्रशंसा केली आहे, पण आता भारताचा वारसा जपण्याची तुझी सामाजिक जबाबदारी सुरू झाली आहे. त्यामुळे, 'ॲनिमल'सारखे सिनेमे यापुढे करू नकोस, मग त्यासाठी तुला कितीही मोठी रक्कम का दिली जात असू देत, कृपया अश्लील किंवा शिवराळ भाषेचा वापर करून स्वतःची वाणी मलीन करू नकोस..."
'रामायण' 5 वेळा पाहण्याची इच्छा... : नितेश भारद्वाज ((Nitesh Bhardwaj On Ramayana)
"मला आशा आहे की, भारतीय प्रेक्षक साई पल्लवी यांचा 'सीता' म्हणून स्वीकार करतील आणि मला सिनेमात कुठेतरी तुलसीदासांच्या चौपाया ऐकायला मिळण्याची उत्सुकता आहे. या सिनेमाच्या निर्मितीबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी, मला हा सिनेमा किमान पाच वेळा पाहायला आवडेल...", असं नितेश भारद्वाज यांनी म्हटलंय.
'रामायण'चं बजेट आणि स्टार कास्ट (Ramayan Movie Budget And Star Cast)
'रामायण'बद्दल बोलायचं झाल्यास, या सिनेमात रणबीर कपूर आणि साई पल्लवी अनुक्रमे राम आणि सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत. याचं दिग्दर्शन नितेश तिवारी करत आहेत. कलाकारांच्या यादीत हनुमानाच्या भूमिकेत सनी देओल, रावणाच्या भूमिकेत यश आणि शूर्पणखेच्या भूमिकेत रकुल प्रीत यांचा समावेश आहे. अरुण गोविल हे राजा दशरथाची भूमिका साकारत आहेत. या सिनेमात उत्कृष्ट व्हीएफएक्स (VFX) पाहायला मिळणार असून, याचं संगीत हॅन्स झिमर आणि ए.आर. रहमान यांनी दिलं आहे.
दरम्यान, 'रामायण' सिनेमा दोन भागांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. पहिला भाग 2026 च्या दिवाळीच्या सुमारास, तर दुसरा भाग 2027 च्या दिवाळीच्या सुमारास प्रदर्शित करण्याचं नियोजन आहे. या सिनेमाचं बजेट प्रचंड म्हणजे 4,000 कोटी रुपये इतकं असून, केवळ एका भागाच्या निर्मितीसाठी 2,000 कोटी रुपये खर्च केले जात आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
