Amruta Fadanvis and Devendra Fadanvis : अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) या त्यांच्या गाण्यांमुळे कायमच चर्चेत असतात. अनेकदा त्या सोशल मीडियावर त्यांच्या गाण्यांमुळे ट्रोल देखील होतात. पण यावेळी अमृता फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासह एका कार्यक्रमादरम्यान गाणं गायलं. लोकमतच्या एका कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह हजेरी लावली होती. 


काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या गाण्याबद्दल सांगितलं होतं. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी हे गाणं लिहिलं असून मी ते गायलं आहे. तसेच हे गाणं लवकरच रिलीज होणार असल्याचं देखील अमृता फडणवीस यांनी म्हटलं होतं. श्रीरामाची स्तुती गाणारं हे गाणं आहे. याच गाण्याची एक झलक म्हणून अमृता फडणवीस यांनी हे गाणं देवेंद्र फडणवीसांसोबत गायलं.


फडणवीसांना गाण्याचा आग्रह


या कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस यांना गाण्याचा आग्रह करण्यात आला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी गाणारी व्यक्ती समोर बसली आहे म्हणत अमृता फडणवीसांकडे बोट दाखवलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, समोर गायक असताना, जो बाथरुम सिंगरही नाही,त्याने गाणं कसं म्हणायचं. घरी गेल्यावर अमृता मला म्हणेल की माझं नाव आणि इज्जत खराब केली, त्यामुळे गाणं तुम्ही अमृताला म्हणायला सांगा. 


मला अनेकदा वाटतं अमृताच्या तोंडाला चिकटपट्टी लावाली... -  देवेंद्र फडणवीस


महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपासंदर्भात अमृता फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे रात्री हुडी घालून जायचे. यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, अमृताने जे सांगितलं ते खोटं आहे के मी कसं बोलणार? राजकीय बाबतीत माझी एक इच्छा असते अर्थात माझी तेवढी हिंमतही नाही की अमृताच्या तोंडाला चिकटपट्टी लावावी अशी मिश्किल टीप्पणी देखील यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली आहे. 


अमृता फडणवीस या सोशल मीडियावर देखील तितक्याच सक्रिय असतात. तसेच त्यांच्या गाण्यासाठी देखील त्यांच्यावर टीका टीप्पणी केली जाते. तसेच आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील अमृता यांच्यासोबत सूर धरल्याचं पाहायला मिळालं. 


ही बातमी वाचा : 


Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : नितीश कुमार आले,मग उद्धव ठाकरे आले तर युती करणार का ? देवेंद्र फडणवीस म्हणाले, नाही!