Mohan Joshi Starrer Deool Band 2: प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली आहे. आठवड्या भरात या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) उत्तम कामगिरी केली आहे. गुरुवारी ईदच्या सुट्टीमुळे प्रेक्षकांनी सिनेमागृहात तुफान गर्दी केली होती.  गुरुवारी चित्रपटाच्या  कमाईत आणखी वाढ नोंदवली गेली आहे.   माहितीनुसार, आठव्या दिवशी सिनेमाच्या एकूण कमाईत सुमारे 5.25 कोटी रुपयांची भर  पडली आहे.  हा सिनेमा आता अनेक चित्रपटांचे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड्स मोडण्याच्या मार्गावर आहे. 

Continues below advertisement

भारतीय बॉक्स ऑफिसवर 'देऊळ बंद 2' या सिनेमानं आपली पकड मजबूत केली आहे.  पहिल्या आठवड्यात 'देऊळ बंद 2' या सिनेमानं 35.50 कोटींचे ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन केले. रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' या सिनेमानंतर 'देऊळ बंद 2' हा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. पहिल्या आठवड्यात 'राजा शिवाजी' या सिनेमानं 42.50 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.  

ज्या प्रकारे 'देऊळ बंद 2' या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर कामगिरी सुरु आहे,  ते पाहता हा सिनेमा 'राजा शिवाजी' या ऐतिहासिक सिनेमाला  टक्कर देऊ शकते असं बोललं जात आहे. दरम्यान, लवकरच 'देऊळ बंद 2' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर डंका वाजवेल, यात शंक नाही.

Continues below advertisement

'देऊळ बंद 2' सिनेमाला प्रेक्षकांचा पाठिंबा (Deool Band 2 Second Day Box Office Collection)

मोहन जोशी, स्नेहल तरडे तसेच इतर कलाकारांचा समावेश असलेला या भक्तीपूर्ण सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.  पहिल्या आठवड्यात या सिनेमाने उत्तम कामगिरी केली.  रिपोर्ट्सनुसार, दुसऱ्या विकेंडमध्ये सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. जी कदाचित पहिल्या वीकेंडपेक्षाही जास्त असू शकते.  दुसऱ्या आठवड्यात हा सिनेमा 50 कोटींचा टप्पा ओलांडेल, यात तीळमात्र शंका नाही. 

मोहन जोशी, स्नेहल तरडे, प्रवीण तरडे,  महेश मांजरेकर आणि इतर कलाकारांचा समावेश असलेला हा भक्तिपूर्ण विनोदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर आधीच मोठे यश मिळवून उभा राहिला आहे. दुसऱ्या वीकेंडमध्ये चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे, जी कदाचित पहिल्या वीकेंडपेक्षाही जास्त असेल. यामुळे दुसऱ्या रविवारच्या अखेरपर्यंत चित्रपटाची एकूण कमाई ५० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडेल. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

1 ट्विस्ट अन् स्टोरीला रंजक वळण, सस्पेन्स थ्रिलर 'दृश्यम 3' बॉक्स ऑफिसवर सुस्साट, किती कोटी कमावले?

ABP माझाच्या बातम्या LIVE..