Pune Crime News : पुणेशहरातूनएकधक्कादायकबातमीसमोरआलीआहे. पुण्यात जनगणना (Census) करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला मारहाण करण्यातआलीआहे. जनगणना (Pune Census) करायला गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला 5 ते 10 जणांकडून आधी शिवीगाळ आणि मग मारहाण (Pune Crime News) करण्यातआल्याचाप्रकार घडलाआहे. पुण्यातील महर्षीनगरमध्येही धक्कादायक घटना घडलीआहे. दरम्यानयाप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यातआलाआहे. पुणे महापालिकेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी याप्रकरणी पोलीसात तक्रार दिलीअसून स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्यापोलीसयाप्रकरणाचीपुढीलचौकशीकरतआहे.

Pune Crime : दगडाने, लाथा बुक्क्यानेमारहाण; स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सगळी घटना 27 मे रोजी दुपारी तीन ते साडेचार दरम्यान मीनाताई ठाकरे वसाहत या ठिकाणी घडली. यातील तक्रारदार या पुणे महानगरपालिकेच्या कर्मचारी असून सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या कामासाठी कार्यरत आहेत. 27 मे रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी या मीनाताई ठाकरे वसाहत या ठिकाणी जनगणनेच काम करत असताना आरोपी विकास मोरे यांची पत्नी क्रांती मोरे, बहिण मुक्ता कसबे, पुतण्या अभिजीत मोरे, या सर्वांनी मिळून त्यांना काम करत असताना अडथळा निर्माण केला आणि त्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली.

महिलाकर्मचारी पुन्हा एकदा त्या भागात जनगणनेचे काम करण्यास गेले असता त्यांनी काल झालेल्या प्रकरणानंतर संबंधित कुटुंबाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, काल झालेल्या भांडणाच्या रागातून मोरे कुटुंबीयांनी कर्मचारीमहिलेलात्यांच्या पाठीमागून येऊन दगडाने मारहाण करून लाथा बुक्क्या देखील मारल्या, अशी तक्रारत्यांनी पोलिसात दिली आहे. यावरून विकास मोरे, क्रांती मोरे, मुक्ता कसबे, लीलावती मोरे, अभिजीत मोरे व इतर अनोळखी पाच महिला व पुरुष यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.

Maharashtra Census : जनगणना करताना राज्यातील तीन शिक्षकांचा मृत्यू

जनगणना करताना यापूर्वी राज्यातील तीन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापुरातील भगवान पाटील आणि सांगोला इथल्या राजाराम ढोले यांचा हृदयविकाराने, तर लातूर मधील सुंदरम वांगसकर यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दु:खद घटनेनंतर त्यांचे कुटुंबीय उघड्यावर आले आहे. जनगणना करणाऱ्या प्रगणकांचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यास कुटुंबीयांस 10 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान द्यावे. तसेच कुटुंबीयांना अनुकंपाखाली नोकरी द्यावी अशी मागणी कोल्हापुरातील खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाने केली आहे. या बाबतचे निवेदन खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघांचे अध्यक्ष राजेंद्र कोरे यांनी आजच कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या