Deool Band 2 Box Office Collection: प्रवीण तरडे लिखित व दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' (Deool Band2) चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुमाकूळ घालतोय. 2015 साली प्रदर्शित झालेल्या 'देऊळ बंद ' या चित्रपटाला महाराष्ट्रभरातून उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. 21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या 4 दिवसांमध्ये 11.62 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. ओपनिंग डे लाच 2.45 कोटी रुपये कमावत या चित्रपटाने दमदार ओपनिंग केली. खरंतर शुक्रवारऐवजी गुरुवारी गुरुपुष्यामृत मुहूर्तावर सकाळी सहा वाजताचा शो ठेवला. अनेक शहरांमध्ये सकाळी सहाच्या शोला प्रचंड गर्दी झाली होती. नंतर शुक्रवार आणि शनिवारी या चित्रपटाने ओपनिंग डेपेक्षा अधिक कलेक्शन केलं. (Deool Band 2)

Continues below advertisement

देऊळ बंद 2 चित्रपटाची तीन दिवसांची कमाई

मराठी सिनेसृष्टीतील बहुचर्चित देऊळ बंद 2 चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 4.85 कोटी रुपयांची कमाई केली. देशभरातील या चित्रपटाचे नेट कलेक्शन 9.85 कोटी रुपये असून ग्रॉस कलेक्शन 11.62 कोटी रुपयांवर गेले आहे. शनिवारी सकाळच्या शोपासून रात्रीच्या शोपर्यंत प्रेक्षक हा सिनेमा बघायला गर्दी करत आहेत.  मुंबई पुणे या भागामध्ये हा चित्रपट सर्वाधिक पाहिला जातोय. शनिवारी 456 शोमध्ये 60 ते 85% प्रेक्षक संख्यसह हा चित्रपट मुंबईत पाहिला गेला. 

पहिल्या दिवशी -2.45 कोटीदुसरा दिवस -2.55 कोटीतिसरा दिवस -4.85 कोटी

Continues below advertisement

सुमारे दहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या देऊळ बंद या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. आता एका नव्या कथानकासह या चित्रपटाचा दुसरा भाग दिग्दर्शक व लेखक प्रवीण तरडे यांनी प्रेक्षकांसमोर आणला आहे. या भागात दुष्काळ शेतकरी आत्महत्या कर्जबाजारीपणा ग्रामीण भागातील गंभीर वास्तव यावर थेट भाष्य करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यावेळी स्वामींना प्रश्न विचारणारी आणि व्यवस्थेला जाब विचारणारी शेतकरी महिला केंद्रस्थानी आहे.

देऊळ बंद' (Deool Band) मध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी (Actor Mohan Joshi) यांनी आपल्या सशक्त अभिनयानं आणि आवाजानं स्वामी समर्थ (Swami Samartha) अक्षरशः प्रत्यक्षात आपल्या समोर उभं राहून आपल्याशी संवाद साधत आहेत, असं प्रेक्षकांना वाटत होतं. तेच सर्वांना 'देऊळ बंद 2'मध्ये अनुभवायला मिळणार आहे. 80 वर्षांच्या मोहन जोशींचा अभिनय पाहून सर्वांना खरोखरंच स्वामीच समोर उभे असल्याचा भास होत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.