Deepika Padukone : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) तिच्या गेहराईंया या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटामधील अभिनयामुळे सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. एका मुलाखतीमध्ये दीपिकानं कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि तिच्या स्ट्रगलची गोष्ट सांगितली.
दीपिकानं सांगितलं की, 'तिनं जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं त्यावेळी पीअर एजंट आणि मॅनेजर नव्हते. पण आज जे नवे कलाकार बॉलिवूडमध्ये पदार्पण करतात त्यांना सगळ्या गोष्टी माहित असतात.' कतरिनाबद्दल दीपिकानं सांगितलं, 'ती स्वत:चा मेक-अप स्वत: करत होती. तसेच ड्रेस देखील ती स्वत:च डिझाइन करत होती.' पुढे दीपिका म्हणाली, 'माझ्याकडे आणि कतरिनाकडे मॅनेजर नव्हता. नंतर मॅनेजर ठेवण्याचा ट्रेंड आला आणि या ट्रेंडला आम्ही फॉलो केलं.'
दीपिका म्हणाली, 'काय करायचं काय नाही या गोष्टी सध्याच्या कलाकरांना माहित आहेत. आम्ही चुका केल्या पण त्या चुकांमधून काही गोष्टी शिकल्यानंतर आमची ग्रोथ झाली. '
दीपिका पादूकोणचा लवकरच पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच 'द इंटर्न' या आगामी चित्रपटामध्ये दीपिका प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अमिताभ बच्चन देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहेत.
संबंधित बातम्या
Rajkummar Rao-Patralekhaa : राजकुमार रावकडून पत्नीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, पत्रलेखासोबतचा फोटो शेअर करत म्हणाला..
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha