Deepika Padukone and Alia Bhatt: बॉलिवूडच्या टॉपमोस्ट अभिनेत्रींच्या यादीत दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) या प्रसिद्ध अॅक्ट्रेसचा समावेश होतो. दोघेही फॅमिलीला टाईम देत आपल्या करिअरकडे लक्ष देतात. दीपिका नॉन फिल्मी बॅकग्राउंडमधील असूनही  तिनं बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपलं स्थान निर्माण केलं. अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात जागा तयार केली.  दुसरीकडे, चित्रपट पार्श्वभूमीतून आलेल्या आलिया भट्टने तिच्या मेहनतीने लोकांना तिच्या अभिनयाच्या प्रेमात पाडले आहे.  दोघांचा प्रवास तसा वेगळाच. वैयक्तिक असो किंवा अभिनयातील कारकीर्द, दोघांनी बॉलिवूडमध्ये आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे.  मात्र, शिक्षणाच्याबाबतीत त्या दोघी सारख्याच आहेत. दोघींनीही पदवी मिळवलेली नाही.

Continues below advertisement

दीपिका पदुकोणचं किती शिक्षण झालं?

2017 साली हेमा मालिनी यांची बायोग्राफी 'बियॉन्ड द ड्रीम गर्ल' लाँच  करण्यात आले.  या लाँचवेळी दीपिकाने आपल्या  शैक्षणिक पात्रतेचा खुलासा केला. तिनं सांगितलं की, "यश मिळवण्यासाठी त्याग आणि समर्पण आवश्यक असते, म्हणूनच करिअरसाठी कॉलेज सोडले", असं दीपिका म्हणाली.  दीपिकाने स्पष्ट केलं की, मॉडेल म्हणून यशाची शिडी चढत असताना अभ्यास सुरू ठेवणे  कठीण होत चालले होते. यामुळे अभिनेत्री 11वी आणि 12वी  पूर्ण करू शकली नाही. त्यानंतर तिनं डिस्टेंस शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, तेही शक्य झाले नाही. त्यामुळे अभिनेत्रीचं 12पर्यंत शिक्षण  घेतलं आहे. 

आलिया भट्टचं किती शिक्षण झालं?

आलिया भट्टने जमनाभाई नरसी शाळेतून शिक्षण घेतले आहे. परंतु, चित्रपटांमध्ये शिक्षण घेण्यासाठी अभिनेत्रीने शिक्षण सोडले.  फार कमी लोकांना माहित असेल की, आलिया भट्टने फक्त दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे.  दरम्यान,  ती एक हुशार विद्यार्थी होती. तिनं दहावीत 71 टक्के गुण मिळवले होते.

आलिया भट्टने शाळा का सोडली?

आलिया भट्टला दोन  वर्षांची असल्यापासून  अभिनेत्री व्हायचं होतं.  तिनं ठरवलं होतं की, बारावीनंतर शिक्षण घेणार नाही.  पण जेव्हा तिला स्टुडंट ऑफ द इअर चित्रपटाच्या   ऑडिशनबद्दल माहिती मिळाली, तेव्हा तिनं बारावीची परीक्षा दिली नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

बिग बॉसची ट्रोफी जिंकली, पण चारचाकी अजूनही मिळाली नाही; गौरव खन्नाचा खुलासा, नेमकं काय म्हणाला?

'ओ तेरी !' सुनील ग्रोव्हरनं केली आमिर खानची नक्कल; लग्नावरही उडवली खिल्ली; मिस्टर परफेक्शनिस्टची प्रतिक्रिया व्हायरल