Sunil Grover Goes Viral for Perfect Amir Khan Look: अष्टपैलू अभिनेता सुनील ग्रोव्हर विनोदी भूमिकांसाठी ओळखला जातो. तो प्रत्येक पात्रात जीव ओतून काम करतो. 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो' मध्ये त्याला विविध भूमिका साकारताना आपण पाहिलंच आहे. सुनील ग्रोव्हर हुबेहुब नक्कल करण्यासाठी ओळखला जातो. सलमान खान असो किंवा शाहरूख खान, त्यानं आतापर्यंत तिन्ही खानची नक्कल केली आहे.  इतकंच नाही  तर, त्यानं अलिकडेच आमिर खानची देखील नक्कल केली आहे. सुनीलनं मिस्टर परफेक्शनिस्टचा अंदाज इतका अचूकपणे साकारला आहे, की प्रेक्षकांनी त्याचं तोंडभरून कौतूक केलं. यावेळी त्यानं आमिर खानच्या लग्नावरही टोला लगावला. नेटफ्लिक्सवरील 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'मधील एका एपिसोडमध्ये त्यानं आमिर खानची नक्कल केली. यावर आमिर खानने प्रतिक्रिया दिली आहे.  त्यानं सुनीलच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

Continues below advertisement

शनिवारी 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'चा नवीन  एपिसोड रिलीज झाला. या भगात 'तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी' या चित्रपटाचे प्रोमोशन करण्यात आले.  चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी  आर्यन खान, अनन्या पांडे शोमध्ये आले होते. शो सुरू असताना अचानक सुनील ग्रोव्हरची एन्ट्री होते. त्यानं आमिर खानचा लूक साकारलेल असतो. त्यानं लाल रंगाची पॅन्ट घातली होती. त्यावर प्रिंटेड कुर्ता, डोक्यावर हेअरबँड आणि चष्मा घातला होता. सुनीलला या लूकमध्ये पाहून  आर्यन आणि अनन्या पांडे काही वेळ गोंधळले होते.  हावभाव आणि अंदाज हा हुबेहुब आमिर खानसारखाच होता.

संपूर्ण भागात सुनीलची अॅक्टिंग भाव खाऊन गेली.  आमिर खानची नक्कल  करतानाचे  त्याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  दरम्यान, आता स्वत: आमिर खानने सुनील ग्रोव्हरच्या अॅक्टिंगचं कौतुक केलं आहे. 'सुनीलची मिमिक्री खूप भारी आणि भन्नाट होती', अशी प्रतिक्रिया आमिर खानने दिली. बॉलिवूड हंगामाशी बोलताना  आमिर खान म्हणाला, "मी याला मिमिक्री म्हणणार नाही. हे इतके खरे होते की, काही क्षण मला वाटले की मी स्वत:ला पाहत आहे.  या कार्यक्रमाची फक्त एक छोटी क्लिप पाहिली आहे. मी लवकरच संपूर्ण एपिसोड पाहणार आहे. ही क्लिप पाहून मी इतक्या जोरात हसलो की, मला श्वासही घेता येत नव्हता", असं आमिर खान म्हणाला. सध्या आमिर खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी सुनील ग्रोव्हरच्या अभिनयाचं  कौतुक केलं आहे.