Dashavatar Movie Box Office Collection: कोकणातल्या (Konkan News) कथेवर आधारित असलेला मराठी सिनेमा (Marathi Movie) 'दशावतार' (Dashavatar Movie) सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office) गाजतोय. हे आम्ही मनानं नाही सांगत बरं का? शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या सिनेमानं चक्क दुसऱ्याच दिवशी कोटींच्या क्लबमध्ये प्रवेशही केला आहे. एवढंच नाहीतर, जगभरातील कमाईत सिनेमानं कोटींच्या कोटी उड्डाणं घेतली आहेत.
'दशावतार' सिनेमानं पहिल्या दिवशीच तब्बल 58 लाख रुपये इतकी कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशीही या सिनेमानं बॉक्स ऑफिस दणाणून सोडलंय. शनिवारी 'दशावतार' सिनेमाच्या कमाईत चांगलीच वाढ झाल्याचं दिसून येत आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'दशावतार'नं दुसऱ्या दिवशी तब्बल 1.39 कोटींची कमाई केली आहे. तर दोनच दिवसांत या सिनेमानं 1.98 कोटींचा गल्ला जमवला आहे. आज रविवार असून आजच्या दिवसांतही 'दशावतार'ची गाडी सुस्साट असेल यात काही शंकाच नाही.
कोकणातला 'कांतारा' बॉक्स ऑफिसवर हिट
तसं पाहिलं तर मराठी सिनेसृष्टीसाठी यंदाचा आठवडा काहीसा आव्हानात्मक होता. या आठवड्यात एकाच दिवशी तीन मराठी सिनेमे रिलीज झाले. 'दशावतार' , 'आरपार' आणि 'बिन लग्नाची गोष्ट' या तिनही सिनेमांमध्ये कोण बाजी मारणार याच्या चर्चा रंगलेल्या. पण, यामध्ये दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'नं बाजी मारली आहे.
'दशावतार'मध्ये मुख्य भूमिकेत दिलीप प्रभावळकर झळकले आहेत. वयाची ऐंशी ओलांडलेल्या दिलीप प्रभावळकरांनी सिनेमात बाबुली मेस्त्रीची भूमिका साकारली आहे. पण, त्यांनी साकारलेल्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. दिलीप प्रभावळकर यांच्याव्यतिरिक्त महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :