IND vs PAK Asia Cup: आज आशिया कप (Asia Cup 2025) च्या 17 व्या आवृत्तीत (Asia Cup 2025) भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आहे, जो रात्री 8 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवला इतिहास रचण्याची संधी आहे. तो 150 T20 आंतरराष्ट्रीय षटकार पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. आतापर्यंत जगातील फक्त 4 फलंदाजांना हा पराक्रम करता आला आहे. भारताने पहिल्या सामन्यात UAE ला 9 विकेट्सने हरवले होते, पाकिस्तानने ओमानवरही मोठा विजय मिळवला. आज पहिला रोमांचक सामना होणार आहे. सूर्यकुमार यादव हा T20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा भारतीय आहे, रोहित शर्मा त्याच्या पुढे आहे.

Continues below advertisement

सूर्यकुमार यादव 3 हिट्स दूर

सूर्यकुमार यादवच्या 84 सामन्यांच्या 80 डावांमध्ये 2605 धावा आहेत, ज्यामध्ये त्याने 147 षटकार मारले आहेत. जर त्याने आणखी 3 षटकार मारले तर तो T20 आंतरराष्ट्रीयमध्ये असे करणारा जगातील पाचवा फलंदाज बनेल. या यादीत रोहित शर्मा अव्वल स्थानावर आहे, ज्याने त्याच्या कारकिर्दीतील 151 डावांमध्ये 205 षटकार मारले आहेत. 35 वर्षीय सूर्यकुमार यादवने 84  टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 80 डावांमध्ये 2605 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 167.30 आहे. त्याने या फॉरमॅटमध्ये 4 शतके केली आहेत.

आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे टॉप 5 फलंदाज

रोहित शर्मा (भारत)- 205मुहम्मद वसीम (यूएई) - 180मार्टिन गुप्टिल (न्यूझीलंड)- 173जोस बटलर (इंग्लंड)- 170निकोलस पूरन (वेस्ट इंडिज)- 149

Continues below advertisement

भारताची संभाव्य टीम 11 

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

पाकिस्तानची संभाव्य टीम 11 

साहिबजादा फरहान, सैम अयुब, मोहम्मद हरिस (यष्टीरक्षक), फखर जमान, सलमान अली आगा (कर्णधार), हसन नवाज, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन शाह आफ्रिदी, सुफियान मुकीम, अबरार अहमद.

भारत विरुद्ध पाकिस्तान हेड टू हेड रेकॉर्ड (टी20)

भारत आणि पाकिस्तान टी२० मध्ये 13 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. पहिल्यांदाच जेव्हा दोघेही टी20 मध्ये आमनेसामने आले तेव्हा निकाल बॉल आउटमध्ये लागला, ज्यामध्ये भारताने विजय मिळवला. त्यानंतर भारताने पाकिस्तानला आणखी 9 वेळा हरवले, तर पाकिस्तान संघ फक्त 3 वेळा भारतीय संघाला हरवू शकला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या