मुंबई : कॉमेडियन डेनियल फर्नांडिसने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांची माफी मागितली आहे. त्याने सुशांत सिंह राजपूच्या मृत्यूसंदर्भात स्टँड अप कॉमेडि केली होती. 11 जानेवारी रोजी सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या ऑनलाईन व्हिडीओमध्ये कॉमेडियनने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणातील मीडिया कव्हरेज आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला सोशल मीडियावर देण्यात आलेली वागणूक यासंदर्भात टीका केली होती.


सुशांत राजपूतच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर डेनियलने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत माफी मागितली. आपली चूक मान्य करत आपण सर्वांसोबत उभे आहोत अशा आशयाची पोस्ट त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. एका युजरने ट्विटरवर लिहिलं आहे की, स्टँड अप कॉमेडीच्या नावावर एक दुखःद घटनेवर विनोद करण्यात येत आहेत. डिस्लाइक आणि हा व्हिडीओ सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत एक विनोद आहे."


कॉमेडियनचा माफिनामा :





सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांची मागितली माफी


डेनिअलने आपल्या माफिनामा सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने लिहिलं आहे की, "माझ्या सध्याच्या एका स्टँड अप कॉमेडि व्हिडीओमुळे सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांची मनं दुखावली गेली. अनेक लोकांनी मला माफी मागण्यास सांगितलं असून मी माफी मागण्याशी सहमत आहे. कॉमेडियन म्हणून माझा फक्त एकच उद्देश असतो की, मी लोकांचं मनोरंजन करणं आणि त्यांना हसवणं याला प्राथमिकता देऊ. परंतु, कधी-कधी या प्रयत्नांमध्ये शक्य आहे, कधी चुकून एखादी चुकीची प्रतिक्रिया माझ्याकडून दिली जाईल."


व्हिडीओ रिएडिट करणार


डेनिअलने पुढे लिहिलं आहे की, "जसं की, सांगण्यात येत आहे, मी माझी चूक मान्य करतो. मी सांगितलं की, रियाला तिच्या आरोपांमधून मुक्त करण्यात आलं आहे. हे पूर्णपणे चुकीचं आहे. ती जामीनावर बाहेर आहे. एखाद्या चुकीच्या कारणामुळे पुण्यातील शोमध्ये मी चुकून तिची निर्दोश मुक्तता करण्यात आलं असं म्हटलं होतं. मी खरं तर स्पष्टपणे सांगू शकत नाही की, मी असं का म्हणालो. मी हा व्हिडीओ मागे घेतोय आणि ज्यांचा भावना माझ्यामुळे दुखावल्या गेल्यात त्यांची मनापासून माफी मागतो."