Crew Box Office Collection Day 1:  करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan), तब्बू (Tabbu) आणि क्रिती सेनॉन (Kriti Sanon) यांची प्रमुख भूमिका असलेला 'क्रू' (Crew) या शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा पहिला टीझर आणि त्यानंतर ट्रेलरनंतर या चित्रपटाविषयीची उत्सुकता जास्त वाढली होती. चित्रपटगृहांमध्ये आल्यानंतर 'क्रू'ला खूप चांगले प्रतिसाद मिळत असल्याचं दिसलं. दरम्यान हा सिनेमा प्रेक्षकांच्या देखील पसंती पडत आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केल्याचं पाहायला मिळत आहे. 


'क्रू' हा सिनेमा 2024 मधील बहुप्रतिक्षित सिनेमा होता.  या चित्रपटात करीना, तब्बू आणि क्रिती सेनन यांनी एअर होस्टेसची भूमिका साकारली आहे.या तिघांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली असून यासोबतच 'क्रू'ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी दमदार ओपनिंग केली आहे. आता या चित्रपटाच्या रिलीजच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे प्रारंभिक आकडेही आले आहेत. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने किती कमाई केली याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 


पहिल्या दिवशी सिनेमाची कमाई


सॅनसिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, क्रू या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 20.7 कोटी रुपये कमवले आहेत. मात्र, हे चित्रपटाच्या कमाईचे प्रारंभिक आकडे आहेत. त्याचप्रमाणे विकेंडमुळे या सिनेमाच्या कमाईला आणखी गती मिळू शकते असं देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे विकेंडला देखली बॉलीवूडच्या या क्रूची जादू कायम राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  या सिनेमाचं बजेट 40 ते 50 कोटी रुपये आहे. तसेच सध्या सुरु असलेल्या सिनेमाच्या घोडदौडीमुळे या सिनेमाला त्याच्या बजेटच्या जास्त कमाई करणं सहज शक्य आहे. 


काय आहे सिनेमाची गोष्ट?


 'क्रू' ही एका दिवाळखोर विमान कंपनीत काम करणाऱ्या तीन एअर होस्टेसची गोष्ट आहे. तिघेही आपापल्या आयुष्यातील समस्यांमध्ये अडकले आहेत. विमान कंपनीत काम करूनही पगार मिळत नाही. मग कथेत एक मोठा ट्विस्ट येतो जेव्हा तिघांनाही काहीतरी चुकीचं करायला भाग पाडलं जातं. त्या तिघी हे चुकीचं काम करणार का? त्यांच्या अडचणीत वाढ होणार का हे सगळं सिनेमा पाहिल्यावर स्पष्ट होतं. 


तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सेनॉन व्यतिरिक्त 'क्रू'मध्ये दिलजीत दोसांझ, कॉमेडियन कपिल शर्मा, सास्वता चॅटर्जी, राजेश शर्मा आणि कुलभूषण खरबंदा यांचाही समावेश आहे. बालाजी टेलिफिल्म्स आणि अनिल कपूर फिल्म अँड कम्युनिकेशन्स नेटवर्कच्या बॅनरखाली तो बनवण्यात आला आहे. लूटकेस-फेम राजेश ए कृष्णन यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.






ही बातमी वाचा : 


Anil Kapoor and Boney Kapoor : घरोघरी मातीच्या चुली! बोनी कपूर आणि अनिल कपूर यांच्या नात्यात दुरावा, बोलणंही टाकलं; नेमकं काय घडलं?