Comedian Pranit More Assaulted : स्टँडअप कॉमेडियन (Stand Up Comedian) प्रणित मोरेला (Pranit More) जबर मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोलापुरात (Solapur News) घडली. सोलापुरात प्रणित मोरेचा शो होता. त्या शोमध्ये अभिनेता वीर पहाडियाबद्दल (Veer Pahariya) विनोद केल्यानं मारहाण केल्याचा आरोप स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत केला. तसेच, याप्रकरणी स्टँडअप कॉमेडियननं पोलिसांत धाव घेतली, पण पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला, अशी देखील माहिती प्रणित मोरनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन दिली आहे. अशातच आता याप्रकरणी अभिनेता वीर पहाडियाची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यानं प्रणित मोरे आणि चाहत्यांची माफी मागितली आहे.

स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण झाल्याप्रकरणी वीर पहाडियानं प्रतिक्रिया दिली आहे. प्रणित मोरेच्या इन्स्टाग्राम पोस्टनंतर वीर पहाडियानं इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन प्रतिक्रिया दिली आहे. प्रणित मोरे सोबत घडलेल्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आपल्याला धक्का बसला असून या प्रकारणाचा आपल्याशी काहीही संबंध नाही. मी कोणत्याही हिंसेचं समर्थन करतं नाही. तरी घडलेल्या प्रकाराबद्दल मी प्रणित आणि त्याच्या चाहत्यांची माफी मागतो. दोषींवर कठोरात कठोर कारवाई होईल, या बाबतीत मी स्वतः लक्ष घालेन." अशी पोस्ट वीर पहाडियानं इन्स्टाग्रामवर केली आहे. दरम्यान, याप्रकरणी वीर पहाडियानं मारहाण करणाऱ्यांविरोधात पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली आहे.
प्रकरण नेमकं काय?
स्टॅन्डअप कॉमेडीयन प्रणित मोरे याच्या दाव्यानुसार, 2 फेब्रुवारी रोजी सोलापुरातल्या एका हॉटेलमध्ये त्याचा स्टॅन्डअप कॉमेडी शो पार पडला. या शो नंतर 11-12 लोकांचा एक गट प्रणितसोबत फोटो काढण्यासाठी पुढे आला. पण त्यांनी अचानक प्रणितला मारहाण करायला सुरुवात केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी प्रणित मोरेला धमकीही दिली. तन्वीर शेख नावाचा व्यक्ती हा या ग्रुपचा लीडर होता. प्रणित यानं वीर पहाडिया बाबतीत केलेल्या विनोदावरून मारहाण केल्याचं म्हटलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणी प्रणित मोर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांनी तक्रार लिहून घेतली नाही, असा दावा देखील प्रणित मोरनं आपल्या या पोस्टमध्ये केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :